बोर्डाच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळोत वा ४५ टक्के, चांगल्या करिअरसाठी कुठल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा हा प्रश्न सर्वानाच सतावत असतो- विद्यार्थ्यांसोबत अगदी त्यांच्या पालकांनाही. अपुऱ्या माहितीमुळे या गोंधळात भरच पडते. म्हणूनच उपलब्ध करिअर्सच्या सुसंधीची माहिती देणारे हे ‘करिअर गाईड’…
१० वी आणि १२ वीच्या परीक्षा एव्हाना पार पडलेल्या आहेत. दरवर्षी महाराष्ट्रात सुमारे २५ लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी १०वी आणि १२वीच्या परीक्षांना बसतात आणि देशात एकूण दोन कोटी विद्यार्थी-विद्यार्थिनी या परीक्षा देतात. पण पुढे काय करायचे हा प्रश्न या सगळ्या मुलामुलींसमोर असतो.
महाराष्ट्र सरकारने मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील सेंट झेवियर्सच्या बाजूला एक उत्तम असे व्यवसाय मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. पण २५ लाख विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या (ज्यात खेडय़ातील मुलांची संख्या १५ लाख आहे) मानाने हे एक केंद्र म्हणजे काहीच नाही. कारण १०वी, १२वीनंतर पुढे काय करायचे? हा प्रश्न प्रत्येक कुटुंबाला पडलेला असतो.
खरंतर, प्रश्नाला अनेक बाजू आहेत. एक तर लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढते आहे. संपूर्ण देशाची लोकसंख्या १३० कोटी पेक्षा जास्त इतकी प्रचंड आहे. पण सरकार शिक्षणावर अत्यंत कमी म्हणजे चार टक्के खर्च करते. हा खर्च आठ टक्क्यांपर्यंत तरी वाढवावा, अशी मागणी खूप वर्षे होत आहे. पण बेशरम पुढाऱ्यांना या मागणीकडे लक्ष द्यायला वेळ नाही!
देशातील ७०टक्के पालक हे एकतर अर्धशिक्षित / अशिक्षित वा गरीब कुटुंबातले आहेत. त्यांना त्यांच्या मुलांच्या / मुलींच्या भवितव्याची प्रचंड काळजी असली तरी अनेकदा त्यांना १०वीनंतर कोणते कोर्सेस आहेत हेही माहीत नसते. तसेच कॉलेजची फी त्यांना परवडणारी नसते. यामुळे अनेक प्रश्न आ वासून निर्माण होत असतात.
मराठी माणसाच्या दुर्दैवाने जिथे मोठय़ा प्रमाणावर नोकऱ्यांची संख्या आहे, तिथे मराठी मुले / मुली वळत नाहीत. उलट, ज्या करिअरमध्ये नोकरीच्या संधी कमी आहेत, तिथेच मराठी पालक मुला / मुलींना पाठवतात!
मुळात करिअरची निवड आपण करतो कशी? खरे तर संपूर्ण जगभर त्यासाठी strength & weakness ही थिअरी वापरली जाते. म्हणजे घरात आरशासमोर उभे राहायचे. खोलीचे दार लावून घ्यायचे आणि वहीचे दोन कागद घ्यायचे. मन एकाग्र करायचे आणि एका कागदावर आपले गुण लिहायचे आणि दुसऱ्या कागदावर आपले दोष लिहायचे. यालाच strength & weakness theory म्हणतात.
मग गुणांवर लक्ष केंद्रित करून करिअरची निवड करायची. किंवा Apptitude (कल), IQ (बुद्धय़ांक), EQ (भावनांक) या तीन चाचण्या द्यायच्या. अनेक विद्यार्थी / विद्यार्थिनी कल चाचणी देतात. पण बुद्धय़ांक व भावनांक चाचणी करून घेत नाहीत. असे ९९ टक्के लोक आहेत की जे आयुष्यात कधीही भावनांक / बुध्यांक चेक करून घेत नाहीत. ही एक फार मोठी चूक आहे.
फिजिक्स / केमिस्ट्री / गणितात तसंच संख्याशास्त्रात वा अभियांत्रिकी वा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्याचा IQ उत्तम हवा. एरवी EQ चांगला हवा. संपूर्ण जगात ज्यांनी चांगली करिअर केली ते लोक एक तर परीक्षेत नापास झाले होते वा त्यांना कमी गुण मिळाले होते. त्यावर अरुण शेवतेंचे- ‘नापास विद्यार्थ्यांची गोष्ट’ हे अप्रतिम पुस्तक आहे. मुळात विहीर भरण्यासाठी चांगला झरा जसा हवा तशी करिअरची विहीर भरण्यासाठी एक उत्तम असा वाचनाचा झराही हवाच.
एकोणीस रुपये पगारावर पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या धीरुभाई अंबानींची निधनाच्या वेळची संपत्ती होती एक लाख कोटी रुपयांची. त्यांच्या हाताखाली अनेक एमबीए काम करत होते, पण त्यांपैकी एकाही एमबीएला असे वाटले नाही की आपण धीरुभाईंप्रमाणे उद्योगपती व्हावं, कारण बहुसंख्य लोकांची मानसिकता ही फक्त नोकरीचीच असते व फारच थोडे लोक उद्योगपती बनण्याचा प्रयत्न करतात.
बिस्मिल्ला खाँन यांनी (बीए विथ शहनाई) केले नाही. तुकाराम महाराजांनी (बीए विथ मराठी) केलं नाही वा पंडित भीमसेन जोशींनी संगीताची पदवी घेतली नाही. जगभर प्रसिद्ध असलेले अनेक वादक, कलाकार, क्रिकेटपटू (विरेन सेहवाग, सचिन तेंडुलकर, धोनी वगैरे), उद्योगपती, वैज्ञानिक (थॉमस अल्वा एडिसन)हे सर्व १०वी, १२वीपयर्ंत पोहोचले नाहीत व नापास झाले होते. पण वर मी जी नावे दिली आहेत त्यांनी आपल्या भावनांकाच्या जोरावर जगातली उत्तम करिअर (खेळ, मराठी, गायन इ. क्षेत्रात) करून दाखविली.
पदवी महत्त्वाची नाही तर शिक्षण – ज्ञान हे महत्त्वाचे आहे. २२०० वर्षांपूर्वीही लोक शिकत होते. राम – कृष्ण – अर्जुन हे सर्व युद्घविद्या, धनुर्विद्या शिकले. आधुनिक विद्यापीठे तयार होऊन फक्त १५० वर्षे झाली आहेत. पण गेली हजारो वर्षे लोक भाषा – वाङ्मय – युद्घ – खेळ या व अशा शेकडो गोष्टी शिकत आहेत. पंडित भीमसेन जोशींनी तर गायन शिकण्यासाठी घर सोडले होते.
वाढत्या लोकसंख्येचा रोजगाराच्या संधींवर प्रचंड परिणाम झालेला आहे. नोकऱ्या नाहीत. देशाचे क्षेत्रफळ वाढत नाही, पण खाणारी तोंडे वाढत आहेत. हा सर्व विषय लोकांना मोठय़ा दारिद्रय़ाकडे घेऊन जाणारा आहे. पण योग्य नियोजनामुळे पाच टक्के बेरोजगारी दूर होऊ शकते. त्यासाठी करिअरची योग्य निवड व्हायला हवी. तशी जर झाली आणि ज्या क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत त्या क्षेत्रात १०वी आणि १२ वीनंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला तर ५० लाख नवीन नोकऱ्या (जे लोक बेरोजगार आहेत त्यांना) मिळू शकतील. पण होतं आहे असं की पालकच अनेकदा मुलामुलींची इच्छा नसताना त्या मुलांना अभियांत्रिकीला व सायन्सला पाठवतात. पुढे त्या मुलाला किंवा मुलीला के.टी. लागते किंवा ते नापास होतात.
प्रश्न असा आहे की, करिअर करण्याचा काही सोपा मार्ग नाही का? काही पुस्तके (विकत घेऊन संग्रही ठेवून) वाचली पाहिजेत. ती जर वाचली तर आपण उत्तम करिअर करू शकतो. शिक्षणाचे दोन मार्ग आहेत. एक औपचारिक शिक्षण आणि दुसरे अनौपचारिक शिक्षण.
याबद्दल गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर आणि म. गांधी यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं आहे. आपण बीए, बीकॉम वगैरे करतो ते औपचारिक शिक्षण आहे. पण समजा मी कॉमर्सचा आहे व मला सायन्सचे शिक्षण घ्यायचे आहे तर पदार्थ विज्ञानाची पुस्तके घरी आणायची, वाचायची आणि अभ्यास करायचा. हे सहज शक्य होतं असे रवींद्रनाथानी सांगितले आहे.
होतं असं की संपूर्ण समाज हा झापड लावल्याप्रमाणे विचार करणारा आहे, त्यामुळे नेहमीच्या शिक्षणपद्घतीव्यतिरिक्तही आपल्याला बरेच काही करता येतं हेच हा समाज विसरला आहे. त्यामुळे असंख्य प्रश्न निर्माण होतात.
एक काऊन्सिलर म्हणून माझ्याकडे जेव्हा लांबलांबचे पालक येतात आणि सांगतात की, आमच्या मुलाला / मुलीला आम्हाला अभियांत्रिकीला पाठवायचे आहे. पण गुण कमी पडत आहेत. तेव्हा मला वाईट वाटते. वास्तविक अभियांत्रिकीचे शिक्षण महाविद्यालयात न जाताही घेता येते.
AMIE नावाचा कोर्स आहे. हा कोलकाता इथे आहे. हा कोर्स करणे म्हणजे अभियांत्रिकी पूर्ण करणे. पण त्याची कोणतीही माहिती नसल्यामुळे जे पालक कौन्सिलिंगसाठी माझ्याकडे येतात ते अभियांत्रिकीला मुलांना प्रवेश मिळाला नाही तर खूपच नव्र्हस होतात.
आज देशात नऊ लाख विद्यार्थी/विद्यार्थिनी दूर शिक्षण पद्धतीने उत्तम शिक्षण घेत आहेत. मराठी मुलांनी फिलॉसॉफी/इतिहास हे वा इतर विषय शिकायचे ठरवले आणि तो सायन्सला असेल तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ वा IGNOU येथूनही त्याला इतर विषयांचे उत्कृष्ट शिक्षण घेता येते.
मुळात करिअरची निवड करताना मुले/मुली त्यांचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी ह्यांचाच सल्ला घेतात. तसे न करता आपल्याला काय आवडते ह्याचा जर विचार केला तर आयुष्यात उत्तम यश मिळते. ‘What they don’t teach you at Horward Business school’ नावाचे एक सर्वोत्तम पुस्तक आहे. ते अवश्य वाचा.
गो. नि. दांडेकर ह्यांचे ‘कुण्या एकाची भ्रमणगाथा’ हे पुस्तक जरी वाचले तरी उत्तम तऱ्हेने करिअर करता येते. कारण आयुष्य हीच Open University आहे. संपूर्ण आयुष्य म्हणजे अभ्यास नाही, तर टक्केटोणपे खाऊन आयुष्यात यश-अपयश, मान-अपमान हे सर्व पचवून आपण शिकतो ते कुठल्याही पुस्तकात वाचायला मिळत नाही.
माझ्या मते, रोज एक Business Standard सारखे आर्थिक वृत्तपत्र वाचणे+ कुटुंबावर प्रेम करणे+ पारधी (लेखक गिरीश प्रभुणे), पॉपीलॉन (लेखक हेन्री श्ॉरीअर) यांसारखी उत्तमोत्तम पुस्तकं वाचणे, तसंच रविंद्रनाथ टागोर किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घेणे म्हणजे आयुष्य !
पण होतं काय की, मराठी मुले/मुली ही चौथी, सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षा देतात, पण ४० लाख रुपये शिष्यवृत्ती देणारी GRE / TOEFL वा GMAT देत नाहीत हे बरोबर नाही.
लंडन टाइम्स हे वृत्तपत्र इतिहास घडवत आहे. ज्यांना कॉमर्स/अर्थशास्त्र वगैरेंचा अभ्यास करायचा आहे त्यांनी हे वृत्तपत्र वाचलेच पाहिजे. प्रश्न असा निर्माण होतो की, आपण चित्रपट कोणते पाहतो? कमीत कमी कपडय़ात जास्तीत जास्त वेळ नाचणाऱ्या मल्लिका/मलायिका/दीपिका ह्यांचे चित्रपट बघून आपल्याला काय फायदा?
त्याऐवजी नायक (अनिल कपूर), भुवन शोम, दो बिघा जमीन, कुंकू, माणूस, रामशास्त्री, आशिर्वाद वा राज कपूर/मधुबाला ह्यांचे सर्व चित्रपट आपण बघितले पाहिजेत. अनेक मुला/मुलींना चित्रपट क्षेत्रात करिअर करायची असते. पण चित्रपटात काम करणे म्हणजेच करिअर करणे नव्हे. तुम्ही दिग्दर्शक/निर्मिती/स्पॉटबॉय वगैरे शेकडो करिअरही यात करू शकता. पुण्याला फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट आहे व त्यात या क्षेत्राशी संबंधीत अनेक चांगले कोर्सेस आहेत.
अनेक मुला/मुलींना नाटय़-नृत्य यात चमकावे असे वाटत असते. त्यांना आता असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. MA (नृत्य) हा अत्यंत उत्तम असा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. खूपच चांगला आहे.
टीव्ही चॅनल्सची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढत आहे. त्यासाठी व इतरत्र काम करण्यासाठी उत्तम पत्रकारांची प्रचंड आवश्यकता आहे. तसेच जाहिरात क्षेत्रातही नोकरीच्या फार मोठय़ा प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत.
घरात खर्च कोण करतं? पुरुष खर्चाचा (फक्त) निर्णय घेतात तर खर्च मात्र मुले/महिला करतात. कॅडबरी घेणे असो, कार्टून फिल्म बघणे असो, नाटक असो वा नॅपकीन घेणे असो किंवा नवीन ब्रॅण्डच्या कपडय़ांची खरेदी ह्याचा निर्णय (खर्चाचा) फार मोठय़ा प्रमाणावर करोडो मुले/महिला घेतात व त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी जाहिरात कंपन्या करोडो रुपये खर्च करतात.
लिरीलची जाहिरात असो वा ‘थंडा मतलब कोकाकोला’ ही जाहिरात असो वा सिमेंटच्या पत्र्याच्या जाहिराती.. त्या तयार कशा करायच्या याचे शास्त्र आहे. त्यासाठी हजारो लोक काम करत असतात. स्क्रिप्ट रायटर म्हणून तुम्ही जाहिरात क्षेत्रात कला शाखेकडे जाऊन उत्कृष्ट काम करू शकता. BMM हा १२वी नंतर तीन वर्षांचा कोर्स आहे वा पदवीनंतर सेंट झेविअर्स कॉलेजसारख्या ठिकाणी एक वर्षांचे जाहिरात कलेचे अनेक अभ्यासक्रम आहेत.
मुळात जाहिरात किती रुपयांची करायची याचा निर्णय उत्पादक कंपनी करते. मग त्यावर जाहिरात कंपनीचे संचालक ती रेडिओवर द्यायची की वृत्तपत्रात द्यायची वा नॅपीसारखी जाहिरात टीव्हीवर करायची वा आपल्या अपेक्षित ग्राहकांपर्यंत पोहोचायचे कसे, हे ठरवत असतात. उदा. नव्या जीन्सच्या पँटची जाहिरात असेल तर ती तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी टीव्हीवर आकर्षक कँपेन- जाहिरात कंपन्या आखत असतात.
जाहिरात/ पत्रकारिता/ कम्युनिकेशन यांचे फार मोठय़ा प्रमाणावर कोर्सेस आहेत. लोकांशी बोलायचे कसे Public Speaking, English Speaking ह्यांचे अनेक कॉलेजेसचे ६ महिन्यांचे, वर्षांचे कोर्सेस आहेत.
मुंबई/पुणे ह्या विद्यापीठात सर्वसाधारणपणे फिलॉसॉफी ते मायक्रोबायोलॉजीपर्यंत १०० विषय शिकवले जातात. पण मुलगा/मुलगी १०वी, १२वी ला जाण्याआधी पालकांनी या महाविद्यालयांची यादी आणली पाहिजे. होतं काय की पालक फक्त करिअर/नोकरी ह्याची चर्चा करतात पण अनेक महाविद्यालयांत कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत ह्याची माहिती मुलगा/मुलगी १०वी, १२वीला गेल्यावर आणत नाहीत.
त्यामुळे प्रश्न निर्माण होतात. १०वीची परीक्षा मार्च महिन्यात होते. त्यानंतर असंख्य पालक गावाला जातात ते थेट मे अखेरीस परत येतात. मग जून महिन्यात निकाल लागतो. मग कमी वा जास्त (अपेक्षेपेक्षा) गुण मिळाल्यावर पालक प्रचंड मोठय़ा प्रमाणावर धावाधाव करतात. माझ्यासारख्या अनेक कौन्सिलर्सना भेटतात.
त्यापेक्षा ४०% गुण मिळाले तर ही करिअर निवडायची, ५०% मिळाले तर कॉमर्स, ७०% वा त्याहून जास्त मिळाले तर प्युअर सायन्स (यात १०८ विषय येतात) किंवा १२वी ला CETमध्ये १८० गुण मिळाले तरच वैद्यकीय शाखेकडे जायचे वा अभियांत्रिकीला १४० गुण मिळाले तरच जायचे असा निर्धार पालक रिझल्टच्या आधी करत नाहीत. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात.
खरी गोष्ट अशी आहे की करिअर खूपच आहेत. ३५० विषयांत BA करता येते. १५० विषयात कॉमर्सचे शिक्षण घेता येते. ११० विषयांत एमस्सी (सायन्स) करता येते. ४६ तऱ्हांनी अभियांत्रिकीला जाता येते व मेडिकल ३० विषयांत करता येते. पण मुळात एवढय़ा करिअर असतात याची माहितीच पालक ठेवत नाहीत. हा दुर्दैवाचा भाग आहे.
शेवटपर्यंत निर्णयच न घेतल्यामुळे १५% मुलांच्या करिअरचे नुकसान होते. हा सर्व प्रकार अत्यंत चुकीचा असून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणारा आहे. अनेक तऱ्हांनी (४६) अभियांत्रिकीचे शिक्षण घेता येते. सेंट झेविअर्स कॉलेजच्या बाजूला Department of Technical Education आहे आणि तिथून जवळच Dept. of Medical Education आहे. या दोन्ही ठिकाणी इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय शाखेचे फॉम्र्स मिळतात.
अनेक CET आहेत. Engg CET, Medical CET वगैरे आहेत. त्यांसंबंधीची सविस्तर माहिती देणारी पुस्तिका (महाराष्ट्रातल्या सर्व अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांची माहिती देणारी) १२वीची परीक्षा झाल्यावर लगेच आणू शकता. आपण ज्या विभागात (विदर्भ, मुंबई, पुणे वगैरे) राहतो तो विभाग सोडून इतर विभागात अर्ज केलात तर Inter University Quota १५ % असतो हा मिळतो. त्यामुळे गुण तुलनेने कमी मिळूनही अभियांत्रिकीचा प्रवेश सुकर होतो. पण ह्या सोप्या गोष्टींचीही माहिती पालक घेत नाहीत.
नॅनो-टेक्नॉलॉजी ही आत्ताची जगातली सर्वोत्तम करिअर आहे. ह्या करिअरला जाण्याची आणि त्यासाठी लागणारा प्रचंड अभ्यास करण्याची कोटय़वधी विद्यार्थी-विद्यार्थिनींची इच्छा आहे.
बीटेक नॅनो टेक हा १२ वी नंतर ४ वर्षांचा कोर्स आहे. सॅट ही शिष्यवृत्ती परीक्षा देऊन आपण ४० लाख रुपये शिष्यवृत्ती मिळवून परदेशात जाऊन हा कोर्स करू शकतो. देशात २४ राज्यातली अनेक मुले मुली ही सॅट परीक्षा देतात. पण मराठी मुले मुली ही परीक्षाही देत नाहीत. खरं तर बीटेक नॅनो करुन वर्षांला १ कोटी ३० लाख पगार आहे.
हा पगार मिळवून ५ वर्षांत ६ कोटी ५० लाख रुपये मिळवून त्यातले एक तृतियांश बचत करुन आपण २९ व्या वर्षी भारतात परत येऊन इथे उत्तम आनंदात आपले आयुष्य जगावे असे मराठी विद्यर्थ्यांना का वाटू नये..पण तसे होत नाही आपण फक्त १ तारखेला मिळणाऱ्या कमी पगारावरच अथवा सरकारी नोकरीत समाधान मानतो.
ज्वेलरी डिझायनिंग यात उत्तम करीअर आहे. ह्याचे काळबादेवी रोड, मालाड, नवसारी, सुरत, अहमदाबाद इ. ठिकाणी सहा महिन्याचे- वर्षांचे उत्कृष्ट कोर्सेस आहेत. भारतीय महिलांना दागिन्यांचा सोस कमी नाही. रोज नित्य नवीन डिझाइन्स बाजारात येत असतात. सोन्याचा भाव लवकरच १७,००० गाठेल. सोन्याला प्रचंड मागणी येतच आहे.
ऑडिट टॅक्सेशन हा अभ्यासक्रम पुणे, नाशिक, औरंगाबाद, दादर, ठाणे, पार्ले, बोरिवली व डोंबिवलीत आहे.
ऑडिट टॅक्सेशन यात प्रचंड पैसा आहे. कारण असे की या देशात २ कोटी लहान मोठे दुकानदार आहेत व ते आणि अनेक नोकरदार लोक टॅक्स भरतात. कोणताही दुकानदार इन्कम टॅक्स वा सेल्स टॅक्स सारखे जे १६ फॉर्मस आहेत ते स्वत: भरत नाही. कारण चुका होतील. म्हणून मग त्यांच्या व्यवहारांची सर्व माहिती घेऊन ऑडिटर शेकडो दुकानदारांचे हे फॉर्मस प्रत्येकी रुपये ४०० आकारून भरतो. यांपासून ऑडिटरला महिना एक लाख रुपये प्राप्ती होऊ शकते.
कॉमर्सच्या वा सायन्सलाही अनेक विद्यार्थ्यांना अकाऊंटस् ऑडिट, टॅक्सेशन, फायनान्स ह्या विषयात उत्तम करीअर करायची संधी असते. त्यांना १२ वी नंतर इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाची कंपनी सेक्रेटरीची पूर्व परीक्षा देऊन कंपनी सेक्रेटरीचा कोर्स करता येतो.
‘सीपीटी’ देऊन सीए करता येते. वा आयसीडब्लूएचा कोर्स करता येतो (मुख्य कार्यालय कलकत्ता). त्यांचा कोर्सही सीए सीएस प्रमाणेच उत्कृष्ट आहे. हे जे कोर्सेस आहेत ना ते अत्यंत अवघड आहेत. सीए करायचे तर अकाऊंटमध्ये प्रचंड इंटरेस्ट हवा वा कॉस्टीेंग करायचे तर कॉस्टिंग विषयाच उत्तम रस हवा वा कंपनी सेकट्ररीचा कोर्स करायचा असेल तर लॉ आणि सेक्रेटरीअल प्रॅक्टीस याची प्रचंड आवड हवी.
तुमची १२ वी नंतर प्रचंड अभ्यास करायची तयारी असेल तर हे सहज साध्य आहे. पण मेहनत खूप आहे आणि अर्थशास्त्र, फायनान्स, अकाऊंटस ह्यात प्रचंड रस हवा. हजारो लाखो विद्यार्थिनी असे आहेत की ज्यांना पदव्युत्तर शिक्षण हे एमबीएत करायचे आहे. पण होतं असं की हे एमबीए लॉजिस्टीक्स वा एमबीए अॅग्रीकल्चर करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे पण यात फार मोठय़ा प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध आहेत.
माझी जन्मठेप किंवा दासबोध वाचून वा सूर्य पाहिलेली माणसे ही पुस्तके आपण वाचलीत तर फिलॉसॉफी, स्वातंत्र्ययुद्ध व मानसशास्त्र या विषयात करीअर करु शकाल. तुम्ही नुसतं सायकॉलॉजी या विषयात करीअर करायचं ठरवलंत तर एम ए (स्पोर्टस्् सायकॉलॉजी) एम ए (क्लिनिकल सायकॉलॉजी) एम ए (काऊन्सिलिंग सायकॉलॉजी) एम ए (डेव्हलपमेंट सायकॉलॉजी) वगैरे १६ विषयात एम ए मानसशास्त्र करु शकता.
जेमॉलॉजी अर्थात हिऱ्यांना पैलू पाडणे हा करीअरचा एक उत्तम मार्ग आहे. गिरगाव चौपाटीवर याचा चांगला कोर्स आहे. हिऱ्यांचे आकर्षण लोकांना सतत वाटत राहणार वा हिऱ्यांना पैलु पाडणे या विषयाकडे लोक वळत राहणार. यातही चांगला पैसा आहे.
प्युअर सायन्सला जाण्यात येत्या काही वर्षांत पूर्वीपेक्षा स्कोप आहे. उदा. एमएस्सी सायटॉलॉजी, एमएस्सी मायक्रोबायलॉजी, एमएस्सी ब्लड सायन्स सारख्या विषयात तुम्हाला एमएस्सी करता येते. त्यात नोकरीच्या संधी मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होतील.
दापोली, राहुरी, परभणी ह्या सारख्या ठिकाणी जी कृषी विद्यापीठे आहेत त्यात आपण १ वर्षांचे सर्टीफिकेट कोर्स इन हॉर्टीकल्चर, सर्टिफिकेट कोर्स इन सेरिकल्चर, सर्टीफिकेट कोर्स इन अॅग्रीकल्चर करू शकतो. हे उत्तम अभ्यासक्रम आहेत. भारतात ७० टक्के लोकसंख्या ही खेडय़ात राहते, त्यामुळे शेतीला प्रचंड वाव आहे. त्यामुळे तुम्ही शेतीत उत्तम करिअर करू शकता. इस्राइलने पाच इंच पाऊस पडूनही चांगली शेती केली आणि स्वत:च्या देशाची प्रगती केली. आपल्या देशातही शेतीशी संबंधित अनेक अभ्यासक्रम आहेत. हे १ ते ३ वर्षांचे अभ्यासक्रम आहेत.
नॅनो टेक जसे उत्तम करिअर आहे तसेच एमएस्सी बायो-फिजीक्स ही बीएस्सी नंतर (दोन वर्षे ) उत्तम करीअर आहे. कारण अनेक विद्यार्थी/ विद्यार्थिनींना पदार्थ विज्ञान व बायोलॉजी ह्या दोन्ही विषयात रस असतो. अशा विद्यार्थी विद्यार्थीनींना बायो-फिजिक्स ही उत्तम करिअर आहे. तसेच केमेस्ट्री ह्या विषयांत बायो-केमेस्ट्री वा अॅनालॅटिकल केमेस्ट्री ह्या विषयांत रस घेता येईल आणि त्यात चांगल्या नोकरीची अपेक्षा आपण जरूर धरू शकता.
फॅशन टेक्नॉलॉजी १२ वीनंतर ३ वर्षे वा नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ह्यातही २/३ वर्षांंची अभ्यासक्रम पूर्ण करून कापड व्यवसायात प्रवेश करू शकता. मात्र या क्षेत्राची तुम्हाला आवड तर हवीच.
तुमची आवड = करिअर = उपजीविकेचे साधन निर्माण झाले तरच तुमचा नोकरीत इंटरेस्ट कायम रहातो. अनेक लोकांना बँकेत जायचे असते, पण इन्शुरन्समध्ये जातात. व काहींना सैन्यात जायचे असते, पण त्यांना प्रवेश मिळतो सरकारी कर्मचारी म्हणून. तसेच अनेक मुला/ मुलींना नृत्य (एमए), ‘नाटय़’ (एमए), संगीत (विशारद= बीए) यात रस असतो पण ही मुले-मुली पुढे काही करत नाहीत हाच प्रश्न आहे. असे जर झाले तर आपली आवड= आपली करिअर असे होत नाही. त्यामुळे आयुष्य अनेकदा निरस वा कंटाळवाणे होते.
गिर्यारोहण या विषयातही उत्तुंग करिअर आहेत. अनेक अंध मुलींनीही एव्हरेस्ट शिखर सर केले. हा भीमपराक्रम आहे. मनात आणलं तर मानसिक ताकदीच्या जोरावर शारीरिक अडचणींवर मात करून एखादा मुलगा किंवा मुलगी काय करू शकतात ह्याचे हे उदाहरण आहे.
मनाली मसुरी- दार्जिलिंग ह्या ठिकाणी इंडियन माउंन्टेनरीतर्फे ६ महिन्याचे एप्रिल ते आक्टोबपर्यंत उत्तम कोर्सेस चालविले जातात. गिर्यारोहणाची आवड आहे त्यांच्यासाठी हे क्षेत्र अप्रतिम आहे.
मेडिकलला अनेकांना जायचे असते, पण प्रवेश मिळत नाही. अशांना Asst. to Oncologist, Asst. to MD, Asst. to T.B. Specialist, Asst. to Gynac, Asst. Lab वा पॅथॉलॉजी, चष्मा तयार करणे किंवा दंतवैद्यक या क्षेत्रांत तीन वषार्ंचे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. उदा. सीएसटीला सेंट जॉर्जेसमध्ये ज्याला CET ची गरज नाही असे दंतवैद्यकसंबंधी कोर्स आहेत.
मला तर असे आढळते की खूप मुला/ मुलींना आर्ट्स शाखेत प्रवेश घ्यायचा असतो. पूर्वी आर्ट्सला प्रवेश घेणे म्हणजे नंतर फक्त शिक्षक / प्राध्यापक होणे असेच होते. पण आता BA (Temple) करता येते. हिंदू असोत वा इतर धर्मीय त्यांचा भक्तिभाव वाढतो आहे. त्यामुळे BA (Temple) महत्त्व आले आहे. कोणत्याही मंदिरासमोरील रांगा व भक्तिभाव वाढतो आहे. तसेच BA ( with Jainism) करून आपण १२ वीनंतर पदवी मिळवू शकतो. अहिंसेची शिक़वण देणारा जैन धर्म अत्यंत उत्तम विचार जगाला देतो आहे. तसेच BA विथ ख्रिश्चनिटी केले तर जगभरातली असंख्य चर्चेस MA विथ ख्रिश्चनिटी करण्यासाठी फार मोठय़ा प्रमाणावर स्कॉलरशिप्स देतात.
विविध भाषांचे अभ्यासक्रमही आता उपलब्ध झाले आहेत. अरेबिक, फ्रेंच, जर्मनी, जपानी, संस्कृत व मुख्य म्हणजे स्पॅनिश या भाषांचा व इतरही अनेक भाषांचा अभ्यास मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी विद्यापीठात उपलब्ध आहे.
अनेक मुला/ मुलींना खेळात प्रचंड रस असतो. मिल्खा सिंग हा १९६४ च्या ऑलिंपिकमध्ये अनवाणी पायाने धावला व चौथा आला. एका क्षणी तो पहिला होता, पण (ऑलिंपिकच्या १०० वर्षांंच्या इतिहासात प्रथमच) धावताना वाटेत थांबून त्याने मागे (इतर खेळाडू येत आहेत ना) पाहिले व मग क्षणार्धात तीन खेळाडू त्याला मागे टाकून पुढे गेले.
पण तेव्हा (१९६४) कोणतेही योग्य प्रशिक्षण+ पैसा नसतानाही केवळ असामान्य मेहनत व मानसिकतेच्या जोरावर त्याने हे यश मिळविले. गेली ८ वर्षे भारतातील बॉक्सर्स वा अभिनव बिंद्रासारखे खेळाडू हे नेमबाजीत भारताला आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात मानाचे स्थान मिळवून देत आहेत. BA with sports हा कोर्स मुंबई व इतरत्रही आहे. तसेच अनेक परदेशी विद्यापीठांच्या सहकार्याने B.sc. (sports) हा कोर्स नेरूळ (डॉ. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज स्टेडियम) येथेही आहे.
महिलांना तर उत्तम संधी आहेत. अभियांत्रिकीत, मग ते ऑटोमोबाईल्स असो वा प्लॅस्टिक वा धातूशास्त्र असो, मुलींना ३० टक्के जागा सर्वत्र राखीव आहेत. त्यांचा फायदाही मुलींनी करून घेतलाच पाहिजे. Bits (पिलानी व गोवा ) येथील CET आपण IIT प्रमाणे दिलीच पाहिजे तशीच आपण Vellore CET व Armed Force Medicle College (सोलापूर रोड पुणे ) ह्यांची CET ही दिलीच पाहिजे.
सरकार मूर्खपणा करते. आता लोकसत्ता- लोकप्रभासारखी लोकप्रिय दैनिके, नियतकालिके प्रचंड खपतात. अशी किमान ५०० नियतकालिके भारतात आहेत. पण सरकार UPSC वा MPSC च्या परीक्षांच्या तसेच, सरकारी परीक्षांच्या जाहिराती हमखास Employament News ह्या साप्ताहिकात देते व आपण हा उत्तम Employament News वाचत नाही. मराठी मुलांना नोकऱ्या का मिळत नाहीत ह्याचे हेही कारण आहे. आपण एक आर्थिक वृत्तपत्र + Employement News जरूर वाचले पाहिजे.
जिथे नोकऱ्या आहेत अशा क्षेत्रात बीएस्सी पर्यावरण (डेहराडून), बीएस्सी ओशनोग्राफी (गोवा), बीएस्सी क्लायमेट (पुणे) या व इतर करिअरचा समावेश होतो.
त्याचप्रमाणे मोबाईल रिपेरिंगचा (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, खेरवाडी वांद्रे) हा ६ आठवडय़ांचा कोर्सही उत्तम आहे. मोबाईल रिपेरिंग करणारी ७ वी, ८ वी नापास मुले/मुलीही एक छोटे मोबाईल रिपेरिंगचे दुकान काढून दरमहा रुपये ४० हजार मिळवतात. एवढी तर एखाद्या इंजिनीअर अथवा डॉक्टरची सुरुवातीची कमाईही नसते.
अनेक युवक/ युवतींना सैन्यात जायचे असते. पण त्यांना NDA सोडून सैन्यात प्रवेश घेण्याची कोणतीही माहिती नसते. वास्तविक पदवीनंतर SSB परिक्षा देऊन सैन्यात प्रवेश घेऊ शकतो वा MA (with Mlitary Science) करूनही सैन्यात जाऊ शकतो.
तसेच उत्तम भाषा शिकून आपण दुभाषा म्हणूनही काम करू शकतो. दुभाषा म्हणून काम करताना वा भाषांतरकार म्हणून काम करताना चांगले पैसे मिळतात. शेकडो, हजारो युवक/युवतींना कॉम्प्युटर सायन्समध्ये करिअर करायचे असते. पण मी आग्रहाने सांगेन की B.E. (Computer) (अभियांत्रिकी) करू नका. कारण B.E. (Computer) हा कोर्स NIIT सारख्या संस्थेतून आपण बाहेरूनही करू शकता. त्याऐवजी B.E. plastic वा B.E. Bio-medical सारखा एखादा कोर्स निवडून सायंकाळी पार्ट टाईम B.E. (Computer) या समकक्ष कोर्स GNIIT हा बाहेरून करा.
तुम्ही B.E. (Computer) केलं नाही तर त्याच चार वर्षांंत तुम्ही दुसऱ्या कोणत्याही विषयात B.E. करू शकता व बाहेरून पार्ट टाईम B.E.संगणकाचे शिक्षण घेऊ शकता. Computer Mangement हा पुणे, मुंबई वगैरेचा पदव्युत्तर MBA (System) नावाचा कोर्सही आहे. हाही उत्तम आहे माझ्या मते SAP हा देशातला सर्वोत्तम कोर्स आहे. (फिनिक्स मिल कंपाऊंड, लोअर परळ- जिनोव्ॉट) येथे तो उपलब्ध आहे. मी याला SAP न म्हणता साप (अवघड) म्हणतो. कारण दोन वर्षांचा हा कोर्स अवघड आहे. पण तो यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर उत्तम नोकरी मिळते.
MITCON ही संस्थाही (शिवाजी नगर, पुणे) उत्तम काम करत आहे. ज्यांना उद्योजक व्हायचे आहे, त्यांना ही सरकारी संस्था चांगले मार्गदर्शन करत आहे. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (गंगापूर रोड, नाशिक) ह्यांचेही ८० च्या वर उत्कृ ष्ट कोर्सेस आहेत व तेथेही अनेक लोक शिकत आहेत. त्यांचे काही अभ्यासक्रम रविवारी असतात, व सोपेही असतात. गच्चीवरील शेती, गांडूळ शेती, लोकांशी बोलायचे कसे, बंगल्यातील शेती, पत्रकारिता, जाहिरात क्षेत्र, B.A. B.Com. हे व इतर उत्तम अभ्यासक्रम आहेत आणि अनेकदा त्यांचा दर्जाही चांगला आहे. ज्याचा खर्चही कमी आहे, ज्यांची परिस्थिती कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे अशी मुले/ मुलीही हे कोर्सेस कमी खर्चात करू शकतात.
मेंदी पैसा लायो..
मेंदी लावणे हे नॅनो टेक्नॉलॉजीनंतरचे सवरेत्कृष्ट करीअर आहे. मुंबईत बोरीवली स्टेशनच्या बाहेर आणि नाशिकमध्ये कॉलेज रोडला अनेक मुलं-मुली महिलांच्या हातावर मेंदी काढतात. मेंदी लावणाऱ्या या मुला/ मुलींची रोजची कमाई हजार-दीड हजार रुपये असते. महिन्याला त्यांना चाळीस हजार सहज सुटतात. सणासुदीच्या किंवा लग्नसराईच्या दिवसांमध्ये आणखी कमाई! तळहाताला मेंदी लावण्याचे ५० तर हातभर मेंदी लावण्याचे १०० रुपये ते घेतात.
शैक्षणिक वेबसाईट्स
देशभरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत, ज्यांच्यामध्ये शिकवल्या जाणाऱ्या उत्तमोत्तम अभ्यासक्रमांची आपल्याला माहिती नसते. पण इंटरनेटच्या माध्यमातून आता ही सर्व माहिती घरच्या घरी मिळणे सहज शक्य आहे. त्यासाठी खालील वेबसाइट्सचा चांगला उपयोग होऊ शकेल..
अलिगढ मुस्लिम विद्यापीठ- http://www.amu.ac.in ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस- http://www.aiims.ac.in अलाहाबाद विद्यापीठ- http://www.allduniv.edu/ अण्णा विद्यापीठ, चेन्नई- http://www.annauniv.ac.in असाम अॅड्मिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज- http://www.assamstaffcol.net असोसिएशन ऑफ स्टेट ट्रेनिंग इन्स्टिटय़ूशन्स इन इंडिया- http://www.asti.nic.in/ बनारस हिंदू विद्यापीठ- http://www.bhu.ac.in बंगाल इंजिनिअरिंग कॉलेज- http://www.becs.ac.in बिरबल सहानी इन्स्टिटय़ूट ऑफ पॅलीओबॉटनी- http://www.bsip-india.org बोर्ड ऑफ इंटरमीजिएट एज्युकेशन, आंध्र प्रदेश- http://www.interboardap.nic.in बोस इन्स्टिटय़ूट, कोलकाता- http://www.bosenet.emet.in सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)- http://www.cbseindia.org सेंट्रल हिंदी डायरेक्टरेट- http://www.hindinideshalaya.ni.in/
सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशनल टेक््नॉलॉजी- http://www.ciet.nic.in/ सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज- http://www.ciefl.org/ सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज एज्युकेशन- http://www.icar.org.in/cife/index.html
सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन लँग्वेजेस- http://www.cil.org/ सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट, पुणे- http://www.cirrpue.com सेंट्रल मरीन फिशरीज रीसर्च इन्स्टिटय़ूट- http://www.cmfri.com/ सेंटर फॉर कल्चरल रीसोर्सेस अॅँड ट्रेनिंग- http://ccrtindia.org चंदिगढ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर- http://cca.nic.in ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर- http://www.cmch-vellore.edu/ कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक््नोलॉजी- http://www.cusat.ac.in कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक््नॉलॉजी, भुवनेश्वर- http://www.cetindia.org कमिशन फॉर सायंटिफिक अँड टेक््िनकल टर्मिनोलॉजी- http://www.cstt.nic.in/ कॉमन एण्ट्रन्स टेस्ट सेल, कर्नाटक- http://www.cet.kar.nic.in दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग- http://www.dceonline.net डिपार्टमेंट ऑफ अॅडल्ट अँड कंटिन्यूइंग एज्युकेशन, चेन्नई विद्यपीठ- http://www.universityofmadrass.edu
डिपार्टमेंट ऑफ बायोटेक््नॉलॉजी, सिंधू महाविद्यालय- http://geocities.com/biorechsmv/ डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्यूटर सायन्स अँड आयआयटीके इंजिनिअरिंग- http://www.cee.iitk.ac.in/ डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, कोचीन विद्यापीठ- http://www.doe.cusat.edu डिपार्टमेंट ऑफ जीऑलॉजी, मोहनलाल सुखाडिया विद्यपीठ- http://www.geolmlsu.org देवी अहिल्या विश्वविद्यालय- http://www.davv.ac.in डॉ. बी. आर. आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी- http://www.drbraou.com डॉ. बी. आर. आंबेडकर रीजनल इंजिनिअरिंग कॉलेज, जालंधर- http://www.recial.nic.in/ एज्युकेशनल मीडिया रीसर्च सेंटर- http://www.emrchyd.org फूटवेअर डिझाइन अॅँड डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट- http://www.fddiindia.com गांधीग्राम रूरल इन्स्टिटय़ूट- http://www.ruraluniv.org गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे- http://www.coep.org गुजरात अॅग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी- http://gau.guj.nic.in गुलबर्गा युनिव्हर्सिटी- http://www.gulbargauniversity.kar.nic.in
गुरू गोविंदसिंग इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटी- http://ggsipu.nic.in हरीश्चंद्र माथूर राजस्थान स्टेट इन्स्टिटय़ूट आँफ पब्लिक अॅड्मिनिस्ट्रेशन- http://hemripa.nic.in/ हरियाणा इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक अॅड्मिनिस्ट्रेशन- http://hipa.nic.in इंडियन स्कूल ऑफ माईन्स- http://www.ism-dhanbed.org इंडियन अॅग्रीकल्चरल रीसर्च इन्स्टिटय़ूट – http://www.airpusa.org/ इंडियन अॅग्रीकल्चरल स्टॅटिस्टिकल रीसर्च इन्स्टिटय़ूट- http://www.icar.org.in/iasri/dafault.html
इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स- http://www.iacs.res.in/ इंडियन असोसिएशन ऑफ सोशल इन्स्टिटय़ूशन- http://www.iassi.nic.in/ इंडियन डायमंड इन्स्टिटय़ूट- http://www.diamondinstitute.net इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅड्व्हान्स स्टडी- http://www.iias.org इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आंत्रप्रेन्यूरशिप- http://www.iie.nic.in इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेन ट्रेड- http://www.iift.edu/ इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट- http://www.iifm.org/ इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक््नॉलॉजी (आयआयटी), कोलकाता- http://www.iit-c.org इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक््नॉलॉजी (आयआयटी), बँगलोर- http://www.iitb.ac.in इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक््नॉलॉजी (आयआयटी), अलाहाबाद- http://www.iita.ac.in इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद- http://www.iimahd.ernet.in इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, बँगलोर- http://www.iimb.ent.in इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, इंदोर- http://www.iimidr.ac.in इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकाता- http://www.iimcal.ac.in इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, कोझिकोड- http://www.iimk.org इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, लखनौ- http://www.iiml.ac.in इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकेजिंग- http://www.iip-in.com इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्वालिटी मॅनेजमेंट- http://iiqm.org इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगलोर- http://www.iisc.ernet.in इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक््नॉलॉजी, दिल्ली- http://www.iitd.ernet.in इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक््नॉलॉजी, कानपूर- http://www.iitkac.in इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक््नॉलॉजी, खरगपूर- http://www.iitkgp.ernet.in इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक््नॉलॉजी, चेन्नई- http://www.iitrm.ac.in इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक््नॉलॉजी, मुंबई- http://www.iitb.ernet.in इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक््नॉलॉजी, गुवाहाटी- http://www.iitg.ernet.in इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक््नॉलॉजी, रूरकी- http://www.rurkiu.ernet.in इंडियन नॅशनल सायंटिफिक डाक्युमेंटेशन सेंटर- http://www.insdoc.org इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट, बेंगलोर- http://www.isibang.ac.in इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट, दिल्ली- http://www.isid.ac.in
गिर्यारोहणातील करिअर अत्यंत उत्तम आहे. याचे कोर्सेस भारतीय माऊंटेनीअरींग फेडरेशनतर्फे कुलू-मनाली, दार्जिलिंग, मसुरी इत्यादी ठिकाणी उपलब्ध आहेत. हे कोर्सेस सहा महिन्याचे असतात आणि गिर्यारोहक प्रशिक्षक म्हणून वा गाइड म्हणून नोकरी मिळते. दऱ्याखोऱ्यात मनसोक्त भटकंती केल्याचा आनंद मिळतो तो वेगळाच!
ऑक्युपेशनल थेरपी हा पॅरा-मेडिकल अभ्यासक्रम आहे. १२वीनंतर केईएम-नायर-जे.जे. सारख्या मेडिकल कॉलेजात हे कोर्सेस उपलब्ध आहेत. ज्यांना MBBS ला प्रवेश मिळणार नाही त्यांना हा कोर्स उत्तम पर्याय आहे. अपघातानंतर प्लॅस्टर वगैरे घातले जाते. काही काळ अपंगत्व येते. अशा रूग्णाला पूर्ण बरे करून त्याला पुन्हा आपले दैनंदिन कामकाज करता यावे, यासाठीचे उपचार प्रणाली शिकवणे हा या कोर्सचा उद्देश आहे.
एमस्सी जेनेटीक हा जिन्सच्या अभ्यासाचा कोर्स आहे. बीएस्सीनंतर दोन वर्षे. महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विद्यापीठात हा कोर्स उपलब्ध आहे. डायबेटीस असो वा अपंगत्व वा हुषारी ही पिढय़ानपिढय़ा (अनुवांशिकतेतून येते का?) यांसह अनेक गोष्टींचा अभ्यास या शाखेत केला जातो.
एमस्सी हॉर्टीकल्चर हा कोर्स (१२वी नंतर ५ वर्षे) उत्कृष्ट आहे. दापोली/परभणी/अकोला इत्यादी ठिकाणी (राहुरीसकट) कृषी विद्यापीठात हा कोर्स आहे. फळबागांची आवड असणाऱ्यांनी हा कोर्स जरुर करावा.
बीएस्सी पर्यावरण हा कोर्स भारतात सर्वात चांगला डेहराडूनला उत्तरांचल विद्यापीठात आहे. १२ वी नंतर (सायन्स ३ वर्षे) करता येतो. पृथ्वी संकटात आहे, प्रचंड वृक्षतोड होते आहे, प्राण्यांचा नाश होतो आहे, ग्लोबल वॉर्मिगमुळे माणसासकट सर्व प्राणीजमात संकटात आहे. अशा वेळेस पृथ्वी वाचवू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने हा कोर्स केलाच पाहिजे.
प्लॅस्टिक इंजिनिअरींग (१२वी नंतर ४ वर्षे) यात खूप मुले प्रवेश घेताना दिसत नाहीत पण अभियांत्रिकीचा हा कोर्स उत्तम आहे. टाकाऊ प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे काँक्रीटच्या रस्त्यात खाली प्लॅस्टिक वापरून त्याचा सदुपयोग करता येईल का? याचा अभ्यास करण्याची संधी या अभ्यासक्रमात आहे.
एमस्सी ओशनोग्राफी हा १२वी नंतर (सायन्स ५ वर्षांचा) अभ्यासक्रम गोवा येथे उपलब्ध आहे. तसेच दक्षिणेकडील काही राज्यातही आहे. समुद्राचा अभ्यास समुद्राप्रमाणेच अथांग आहे. त्याची आवड मात्र हवी. समुद्राच्या तळाशी गेल्या लक्षावधी वर्षांची रहस्ये दडली आहेत. हा कोर्स करून समुद्र-पर्यावरण यांचा चांगला अभ्यास होतो.
बीएस्सी लाइफसायन्स हा कोर्स मुंबई-पुणे-औरंगाबाद-नागपूरसारख्या सर्व मोठय़ा विद्यापीठात उपलब्ध आहे. १२वी नंतर ज्यांना जीवशास्त्रात करिअर करायचं आहे त्यांना हा कोर्स चांगला आहे. फार्मा कंपन्या, इस्पितळं इत्यादीत नोकऱ्याही आहेत. कोर्सचा खर्च कमी आहे.
एमबीए लॉजिस्टीक हा पदवीनंतरचा अभ्यासक्रम सर्व मोठय़ा मॅनेजमेंट संस्थांमध्ये उपलब्ध असून तो नोकरी मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे. यात बोटी/समुद्र/बंदर/माल उतरवणे/शिपिंग यांच्याशी संबंधित व्यवस्थापनाच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात.
एमबीए फॉरेन ट्रेड हा कोर्स महाराष्ट्रासह देशातल्या सर्व राज्यांतील मोठय़ा मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटमध्ये शिकवला जातो. कोणत्याही ज्ञानशाखेच्या पदवीनंतर दोन वर्षांचा हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. आयात-निर्यात, त्याचे कायदे/नियम, वस्तू परदेशात पाठवणे/आणणे इत्यादी शेकडो गोष्टींचा अभ्यास यात होतो. नोकरी मिळवण्यासाठी हा कोर्स चांगला आहे.
कॅपिटल / कमोडिटी मार्केट ह्यांचे तीन महिन्यांचे व एक दिवसांचे तसेच शेअर मार्केटसंदर्भात इतरही कोर्सेस बाँबे स्टॉक एक्स्चेंज, दलाल स्ट्रीट इथे चालवले जातात. त्यामुळे लाखो लोक हे कोर्सेस करून आणि एखादे आर्थिक वृत्तपत्र वाचून अभूतपूर्व यश मिळवू शकतात. शेअर बाजारात प्रचंड पैसा कसा मिळवायचे याचे अधिकृत शिक्षण इथे दिले जाते.
बीए (इस्लाम) हा १२वी नंतर तीन वर्षांचा अभ्यासक्रम अलिगढ विद्यापीठात चालवला जातो. इस्लामी रितीरिवाज-धर्म-धर्मग्रंथ यांसह सर्व इस्लामी प्रथांचेही शिक्षण यात जाते.
पत्रकारिता- लोकांशी बोलायचे कसे- कम्युनिकेशन -जाहिरात क्षेत्र इत्यादींशी संबंधित १२वी नंतरचा इटट हा अभ्यासक्रम अनेक महाविद्यालयात आहे.
बीए स्पोर्टस् हा अतिशय उत्तम अभ्यासक्रम १२वी नंतर ३ वर्षे (पतियाळा) आहे. मिल्खासिंग / पी.टी. उषा सारखे अनेक उत्तमोत्तम खेळाडू या कोर्स चालवणाऱ्या विद्यापीठात सल्लागार होते / आहेत. क्रीडाप्रेमींसाठी याच्याएवढा चांगला अभ्यासक्रम नाही.
बीई इलेक्ट्रॉनिक्स हा अत्यंत विद्यार्थीप्रिय असा अभ्यासक्रम १२वी नंतर ४ वर्षांत करता येतो. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व विद्यापीठात हा कोर्स CET च्या गुणांवर प्रवेश घेऊन करता येतो.
एम संस्कृत हा अभ्यासक्रम १२वी नंतर ५ वर्षे मुंबई / पुणे / नागपूर सारख्या सर्व विद्यापीठात आहे. संस्कृतचा अभ्यास फक्त भारतीयच करतात असे नाही तर स्वीडन / जर्मनी / अमेरिका येथील लोकही मोठय़ा संख्येने हे अभ्यासक्रम शिकतात.
बीए लॉजिक १२वीनंतरचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम मुंबई / पुणे / औरंगाबाद / नागपूरसह सर्व मोठय़ा विद्यापीठात आहे. जर तर्कशुद्घ विचार कसा करायचा हे शिकायचे असेल तर याच्यासारखा उत्तम अभ्यासक्रम दुसरा नसेल.
बीए योगासन हा १२वी नंतर तीन वर्षांचा उत्तम अभ्यासक्रम आहे. ध्यानधारणा प्राणायाम इथपासून योगासनांपर्यंत अनेक गोष्टी फिटनेस क्रेझमुळे सध्या योग शिकवणाऱ्या शिक्षकांना चांगली मागणी आहे.

चांगल्या करीयरसांठी दहावी-बारावी ऊत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थीनींनी स्वतःचे करीयर घडविणेसांठी सदरहू लेख वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यायोगे आपण सर्व आपले-आपल्या आईवडीलांचे तसेंच समाजाचे नावलौकिकात आवश्य भर घालू शकाल…शुभम् भवतूः…!