समाज सेवा करा हेवा नाही.
समाज संगटन करा विघटन नाही.
समाजविकास करा भकास नाही.
समाजविचार करा अविचार नाही
समाजकार्य करा राजकारण नाही.
समाजात मेळ घाला खीळ नाही.
समाजावर प्रेम करा गेम नाही.
समाजाची प्रगती करा अधोगती नाही.
समाजावर भक्ती करा सक्ती नाही.
समाज पोषण करा शोषण नाही.
समाज शुध्द करा बेशुध्द नाही.
समाज जतन करा पतन नाही.
समाजावर कृपा करा अवकृपा नाही.
समाजभाव करा दुजाभाव नाही.
समाजावर आस्था ठेवा अनास्था नाही.
समाज स्वच्छ ठेवा अस्वच्छ नाही.
समाजावर श्रध्दा ठेवा सक्ती नाही.
समाजात अजब करा गजब नाही.
समाज तारक व्हा मारक नाही.
समाज कर्मिक व्हा हार्मीक नाही.
समाज भक्त व्हा द्रोही नाही.
समाज पालक व्हा घालक नाही.
समाज कैवारी व्हा जिव्हारी नाही.
समाज रक्षक व्हा भक्षक नाही.
समाजीकरण करा राजकारण नाही.
समाज दाता व्हा याचक नाही.
समाजनायक व्हा खलनायक नाही.
समाजप्रेमी व्हा समाजद्रोही नाही.
समाज हीत जोपासा अहित नाही.
समाजात शिस्त ठेवा बेशिस्त नको.
समाजात भयमुक्त रहा भययुक्त नाही.
समाजवादी व्हा समाजभेदी नाही.
समाजासांठी धुंद व्हा अंध नाही.
समाजदूत व्हा समाजव्देषी नाही.
समाजवंत व्हा स्वगरजवंत नाही.
प्रा.सी.डी.साळुंखे,चोपडा-धुळे.


आपण समाजाचे देणं लागतो हे विसरतां कामा नये.
माननीय प्रा.साळुंखे सर
विचारधारा खुप सुंदर,महत्वाची व सर्व लोकसेवकांनी पालन करावी अशी आहे.
सर , समाजात नेते ,कार्यकर्ते यांनी याचे पालन करायला हवे. यावर चिंतन होणे गरजेचे आहे.
Thanks Sir for your valuable comment.