» वाटा करिअरच्या – कॉमर्स, आर्टससाठी अवांतर संधी

कॉमर्सची पदवी घेताना नववी ते बारावी दरम्यान पालकांनी घातलेली बंधने झुगारून टाकली जातात. अभ्यास नावाचा प्रकार, क्लास नावाची भानगड व कंपल्सरी अटेंडन्सचे लचांड सीनिअर कॉलेजात क्वचितच असते, पण आवडीच्या एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणारा पदवीदरम्यान अनेक बाबतीत सक्षम होऊ शकतो, हेच वाक्य बीए संदर्भातसुद्धा तितकेच खरे आहे, पण आर्टसवाले खूप खूप उदासीन असतात हेही तितकेच खरे!

बघाना, इंटिरियर डेकोरेशन, फॅशन डिझाइन, कॉस्मेटिक्स, जिम्न्स्ट्र क्टर, अनिमेशन, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी, ज्वेलरी डिझायनिंग, ग्राफिक डिझाइन, ट्रॅव्हल अँड टुर्स असे अनेक कोर्सेस प्रत्येक शहरात उपलब्ध आहेत. मात्र भल्या घरच्या, ‘भल्या शिस्तीच्या, मल्या मार्कांचे विद्यार्थी याकडे न वळता सहजगत्या सांगतो, ‘आत्ता ना मी गितार शिकायचा विचार करतो आहे.
जरूर शिका, पण तो छंदच आहे ना? आई-वडील अगदी आग्रहाने एखाद ‘फॉरेन लैंग्वेज’ शिकायला मुलामुलींना पाठवतात. मात्र ‘बी.कॉम’नंतर त्या भाषेचा व्यवहार उपयोग काय हा प्रश्नही त्यांना पडल नाही. कारण फारच क्वचित त्याभाषेच्या देशात कॉमर्स पदवीधराचे अल्पसे काम निघू शकते. तिथे नोकरी तर दृष्टिपथातच नसते. मात्र हे सांगूनसुद्धा पालक म्हणतातच, ‘नाही म्हणजे एखादी
परदेशी भाषा शिकलेली बरी असते.’
बी.कॉम. पदवीनंतर ओघाने येणारे अभ्यासक्रम म्हणजे डीटीएल, एलएलबी,
एमबीए, मास कम्युनिकेशन, डिजिटल वा प्रिंट जर्नालिझम, अॅडव्हर्टायझिंग. या
सा-यांच्या तयारीसाठी, प्रवेशपरीक्षेसाठी पदवीच्या वर्षात माहिती घेणे खूप उपयुक्त
ठरते. ज्यांना बँकांच्या परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांनी तर संपूर्ण तीन वर्षात त्याचे
पेपर्स सोडवणे गरजेचे ठरते. पदवीनंतर आता काय म्हणण्यापेक्षा उपयुक्त, पूरक,
प्रवेशपरीक्षेसाठी गरजेचा अभ्यास सेकंड इयरच्या दिवाळीपासून रोज फक्त एक ।
तास करावा. खरेतर अशा पाचशे तासांतून दमदार यशाची सुरवात होत असते.

1 Comment

  1. करीयर करायचे ते आधि ठरवायचेl
    जे कांहि पाहिजे वेब पोर्टलवर शोधायचेll

Leave a Reply

Your email address will not be published.


*