माझी आजी – गं. भा. शंकुतलाबाई रामदास कोतवाल


बाबांची आई म्हणून अगदी जवळचं नातंआजी नातवाचं
आई संगती आजी म्हणजे दुधावरची साय देणं हे देवाचं
आजीची आठवण तर आजही येते मला
अजुनही तिच्या लुगड्याची उब भासते मला
लहानपणाच्या सगळ्या गोष्टी आठवतात मला
आज ही आजी माझ्या जवळच वाटते मला…
माझी आजी ही अगदी साधी सरळ
कापसासारखीच मऊ आणि कोमल
शकुंतला नावाचीच स्वभावाची अगदी पार्वती
जगावेगळी जगासाठी जगणारी ती…
मला आज ही आठवतं, माझ्या करता रात्रो-न-रात्र जागायची
आईने आंघोळ घातल्यानंतर आंग तीच पुसायची ।
काजळाची तीट लाऊन माझी दृष्ट काढायची नवी गोष्ट सांगायची बरोबरच
शुभम् करोति ही बोलवुन घ्यायची
दर रविवारी नाव्ह्याकडे ही तीच घेऊन जायची
शाळेतनं यायला जरा वेळ झाला तर
अगदी सगळं घर डोक्यावर घ्यायची
माझ्या ताटात काही तर गोड म्हणून निदान
गूळ-तुप तरी ठेवायची. ।
दुपारचं जेवणच काय, सगळी दुपारच
आजी आजोबांच्या संगतीत मस्त जायची
सीताफळ हे आजीचं फेवरेट होतं
अगदी येव्हढं की गीर तीच्या
लुगड्यावर साण्डला तरी चालायचं
साखर खायची नाही म्हणून चुपचाप आम्ही दोघे
दुपारीचं दोन चार पाच गटाक करून जायचो
तेव्हा लहान होतो म्हणून मला नाही कळायचं
नाही तर, सॉरी आज, मी ही टोकलच असतं
अता सीताफळे खाताना तुझी खुप आठवण येते ।
बाबा काही बोलत नाही, पण त्यांनाही तुझी कमी भासते
आज आजी आम्हाला सोडून गेलीही तिला कळले असते की
मला मोठ्या कंपनी मध्ये चांगल्या पदावर नोकरी लागली तर
तीच्या ही डोळ्यात आलं असतं पाणी
तीचेचं ते आशीर्वाद, दुर्वा ।
आज तीने डोळे नेहमी करता मीटले आहे
पण ती आताही ही आमच्या मध्ये, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रुपात
आम्हाला पाहून राहिली आहे ।
आता तिच्या करता देवाशी काय मागु ती स्वत:च देवाजवळ
आहे पण हो देवाशी प्रार्थना करतो ।
प्रत्येक घरावर आजी आजोबांची सावली असो पुढल्या जन्मी ही मला हीच आजी मिळो…

आजीस विनम्र अभिवादन… खुप मिस करतो तुला आजी… ???

  • लोकेश कोतवाल, कुर्हे पानाचे (पुणे)

4 Comments

  1. आजी नातवाची आठवण करी ताजीl
    नातवाचे लाड पूर्ण करी ती फक्त आजीll
    आजीस विनम्र अभिवादनl
    तेची या घडीचे नामी साधानll

Leave a Reply to C.D,Salunkhe Cancel reply

Your email address will not be published.


*