व्यक्तीः व्यक्तीमत्व विकास

प्रत्येक व्यक्ती जन्माला येतांनाच आगळं-वेगळं रुप घेऊन येत असतं, एखादं हसरं-आनंदी तर दुसरं रडकं-रडतराव; रात्री खेळणारं व दिवसा रडणारं किंवा दिवसा झोपणारं -रात्री रडणारं•

▪व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात,सर्वच महात्मा,लोहपुरुष नसतात तसेंच सर्वच डाकू लुटारू नसतात. एखाद्याला चाणक्य म्हटले किंवा राजेशखन्नासारखी केशरचना केलेवर ते चाणक्य-राजेशखन्ना होत नाहीत.वाल्ह्याचा वाल्मिकी व्हायला तशी परिस्थिती यावी लागते.मानवामध्ये देवत्व नसले तरी काहि महाभाग इतके नीडर होतात किं त्याला लीडर रुप देऊन मोकळे होतात व आपली पोळी भाजून घेतात•

▪प्रत्येक व्यक्तीतील गुण-दोष,खरे-खोटेपणा,आवड-निवड तथा स्वभावधर्मानुसार-व्यक्तीमत्व ठरत असते. एखादी अडाणी व्यक्ती चाणाक्ष असते तर बुध्दीवंत मात्र स्वतःचे निर्णय योग्यरित्या घेऊ शकत नाही, म्हणूनच मी सर्वकांही करूं शकतो असे म्हणणारी व्यक्ती हवं तस्स् करूं शकत नाही तर भितीपोटी काहिंच करूं न शकणारी व्यक्ती तसे करुन जाते.सुप्त गुण-अवगूण,उत्साह-निरुत्साहता ओळखून चैतन्य निर्माण करणेचे ध्येयाने योग्य प्रेरणा जागृत करणे महत्वाचे असते.

मीठ,साखर,तिखटाची चव ते तोंडात घेतलेवर कळते,दगडापासून मूर्ती घडवून दगाडाला देवत्व आणतां येते त्याचप्रमाणे व्यक्ती कशिही असूं देत तिचे व्यक्तीमत्व घडविणे सांठी योग्य ते प्रयत्न करणेसांठी विवीध पैलूंवर भर देणे उचित ठरूं शकते.

प्रत्येक व्यक्ती एकमेवाव्दितीय असते अश्या व्यक्तीतील अंतर्गतक्षमता जागविणेची गरज लक्षांत घेतां आळशी तथा नैराश्यांत गुरफटलेल्या व्यक्तीची निच्छीत स्थिती ओळखून त्याची कार्यक्षमता वाढवून त्यांस प्रसन्नतापुर्वक ऊचीत ध्येयाने ऊद्देशपूर्तीसाठी प्रेरीत करता येऊ शकते, म्हणूनच व्यक्तीमत्व विकास घडवून आणणेसांठी कसब पणाला लावणे महत्त्वाचे ठरते•

व्यक्तीमत्व विकासाचे मुद्देः

▪सकारत्मक दृष्टीकोनः

▪आनंदी व उत्साही रहा :

▪स्वतःसाठी उच्च ध्येय :

▪समाज संघटन कौशल्य :

▪गुणी व्यक्तीची प्रशंसा :

▪प्रत्येकवेळी दुसऱ्याची ऊणीदुणी काढणेची वृत्ती:

▪वक्तृत्वशैली सुधारणेचे ध्येय :

▪रहाणीमान :

▪संभाव्य संकटाचा सामना करणेची वृत्ती :

▪दृढ आत्मविश्वास :

▪तणावमुक्त रहाणेची कला :

▪निर्णयक्षमता :

▪मनातील भितीवर नियंत्रण :

▪उदात्त हेतू :

▪गर्वरहित स्वाभीमान :

▪ज्ञानार्जनक्षमता :

▪विकासात्मक विचारसरणी :

▪लबाडी-लुच्चेगिरीपासून अलिप्त :

▪स्वतःचे ज्ञान देणेची कामना :

▪चांगले ते आत्मसात करणेची कला :

▪समाज संघटनेत गुणवंताचा यथोचीत गौरव व योग्य दिशा दाखविणे :

▪गुणी व्यक्तीसाठी खुलेदालन,स्टेज उपलब्धता:

▪समर्पणाची तयारी :

असे अनेक मुद्दे व्यक्तीमत्व घडविणेसांठी विचारात घेणे महत्वाचे असते कारण ‘अज्ञानीला-सज्ञानी;अडाणीला-शहाणा; अशिक्षीताला-शिक्षीत; निराशावादीला-आशावादी किंवा असमंजसला-समंजस… या सर्वगोष्टी सहजासहजी करणे जसे कठिण आहे त्याचप्रमाणे व्यक्तीमत्व विकासाला चालना देणे किंवा ते घडविणेची कला अवगत करणे सुध्दां जिकरीचे कार्य ठरूं शकते असा विचार विचारवंतानी केलेस व्यक्तीमत्व विकास करणे सुलभ व्हावे•

शुभम् भवतूः

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*