वाढत्या रेडिएशनचा प्रभाव कमी करण्यासाठी धुळे येथे कार्यशाळेचे आयोजन


नंदुरबार शहरातील क्यूमाईन कल्ब समोरील आयएमए सभागृहात रेडिओग्राफर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यामार्फत रेडिएशनचा वाढता दुष्परिणाम या विषयावर आधारित एक दिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळा चे अध्यक्ष त्रिलोकी मिश्रा होते, रेडिओग्राफर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील चव्हाण, नॅशनल कोऑर्डिनेटर शंकर भगत, जगदीश जगताप, विलास भदाणे आदी उपस्थित होते. डॉक्टर सोनवणे यांनी रेडिओलॉजी विभागात येणारे विविध अडचणी निराकरण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेस धुळे नंदूरबार जळगाव या तीनही जिल्ह्यातील रेडिओलॉजिस्ट यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सदर कार्यशाळा यशस्वीतेसाठी अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती चे सचिव आणि रेडिओलॉजिस्ट असोसिएशनचे नंदुरबारचे जिल्हा अध्यक्ष श्री. विजय बडगुजर, तसेच धुळे शहर अध्यक्ष श्री. मनीष जोशी, मनोहर परदेशी आणि महेंद्र भामरे यांनी प्रयत्न केले. सदर कार्यशाळेत नक्कीच रेडिओलॉजी क्षेत्रामध्ये प्रगती घडून भविष्यात येणाऱ्या समस्यांचे निराकरण होईल म्हणून सर्व रेडिओलॉजिस्ट यांच्या प्रयत्नांना यश येईल हीच सदिच्छा.
युवक समिती तसेच प्राऊड ग्रुप तर्फे … सर्व रेडिओलॉजिस्ट यांच्या प्रयत्नांना हार्दिक शुभेच्छा?

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*