चि. सौ. का योगिता आणि डॉ. श्यामकांत बडगुजर यांचा आदर्श विवाह श्री क्षेत्र कनाक्षी येथे संपन्न

कढोली येथील कै. हिरामण रघुनाथ बडगुजर यांचे नातू तसेच श्री. भास्कर हिरामण बडगुजर यांचे सुपुत्र चि. शामकांत आणि थाळनेर येथील श्री. हिरामण नथ्थू बडगुजर यांची नात तसेच श्री. प्रकाश हिरामण बडगुजर यांची ज्येष्ठ कन्या चि. सौ. का. योगिता यांचा शुभविवाह अत्यंत साध्या पद्धतीने दिनांक 10 एप्रिल 2019 रोजी श्री क्षेत्र कनाक्षी भडगाव जि. जळगाव येथे नुकताच संपन्न झाला.

सदर विवाहाची चर्चा संपुर्ण कनाक्षी गावात झाली. तसेच कनाक्षी गावातील सरपंचांनी या विवाहाला आदर्श विवाह म्हणुन जाहीर केले.

जास्त पैशाची नासधूस न करता अत्यंत साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला.

सदर विवाहासाठी वर वधूपक्षाकडून साधारण दोनशे लोक वगळता संपूर्ण कनाक्षी गावातील रहिवाश्यानी हजेरी लावली होती.

तसेच वधु वरास शुभ आशीर्वाद दिले. लग्नात घोडा, बँन्ड बाजा, डीजे यावर होणारा वायफळ खर्च टाळून पूर्ण गावाला गाव पंगत दिली होती. तसेच वर पक्षाकडील मंडळींनी कुठलाही प्रकारचा हुंडा न घेता लग्नाचा सर्व खर्च केला आणि वधूला वधु न समजता स्वतःची मुलगी समजून शुभ आशीर्वाद दिलेत. या विवाह सोहळ्याचे आपल्या समाजातील मंडळींनी एक उदाहरण घेऊन लग्नात होणारा वायफळ खर्च कमी करावा हीच समाजाला नम्र विनंती आहे. सदर नवविवाहीत जोडपे बडगुजर समाजाकडून भरभरून आशीर्वाद तसेच त्यांच्या संसाराचा सहजीवनाचा प्रवास सुरळीत चालावा हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.

शुभेच्छूक – अ. भा. बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप

चि. सौ. का. योगिता आणि डॉ. शामकांत बडगुजर

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*