न्यू माँ चामुंडा मोबाईल ग्रुप पारोळा यांच्या तर्फे वणी गड येथील आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणार्‍या भाविकांना अल्पोपाहार चे वाटप

न्यू माँ चामुंडा मोबाईल ग्रुप पारोळा यांच्या तर्फे वाणी गड येथील आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणार्‍या भाविकांना अल्पोपाहार वाटप करण्यात आले. आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी चालत जाणार्‍या भाविकांना न्यू माँ चामुंडा मोबाईल ग्रुप पारोळा हे गेल्या चार वर्षांपासून अल्पोपाहार चे वाटप करत आहेत. या वर्षी देखील यांच्या तर्फे पारोळा ते वणी गड पर्यंत भाविकांना अल्पोपाहार, पाणी, बिस्किट पाकीट, चॉकलेट, लस्सी पाऊच, लाडू इ. वाटप करण्यात आले, त्यांच्या तर्फे भाविकांची ही सेवा अविरतपणे सुरू आहे.

न्यू चामुंडा मोबाईल चे मालक तसेच अखिल भारतीय बडगुजर समाज मंडळ पारोळा चे खजिनदार – श्री. कैलास बडगुजर यांच्या तर्फे हे वाटप करण्यात आले, यावेळी त्यांच्या सोबत अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती जळगाव जिल्हाध्यक्ष – श्री दिनेश बडगुजर, समाजिक कार्यकर्ते – श्री. सचिन महाजन, श्री. अक्षय महाजन, श्री. सुरज चौधरी,श्री सागर भोई, श्री सागर शिंपी, ईश्वर पाटील, होते व यांचे अनमोल सहकार्य लाभले.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*