भुसावळ शहर जागृती महिला मंडळ यांची मिटींग श्री. प्रशांत कमलजा यांच्या घरी संपन्न

भुसावळ शहर जागृती महिला मंडळ यांच्यातर्फे दर पौर्णिमेला घेण्यात येणारी मीटिंग आज दि.19/04/2019 रोजी श्री. प्रशांत अरुण कामळजा यांच्याकडे घेण्यात आली.
आज हनुमान जयंती असल्याने सर्वप्रथम हनुमंत प्रतिमा पूजन व कुलदेवी श्री चामुंडा माता पूजन करून आरती करण्यात आली.
सदर मीटिंग मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सौ.लताताई प्रदीप बडगुजर यांनी निवडणुकीबद्दल,व राजकीय पक्षांबद्दल माहिती दिली.
बैठकीला अ. भा.ब.स. चे अर्थनियोजन समिती प्रमुख श्री.सुरेश महाले साहेब ,श्री.निलेश बडगुजर,श्री.गणेश बडगुजर, श्री. संजय बडगुजर, तसेच महिला मंडळातील सौ.विजयाताई बडगुजर , सौ.लताताई बडगुजर ,सर्व पदाधिकारिंसह इतर महिलावर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

1 Comment

Leave a Reply to C.D,Salunkhe Cancel reply

Your email address will not be published.


*