चिंचोली येथील सुसंस्कृत व्हाट्सअप ग्रुप मार्फत स्वयंअध्ययन अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन

चिंचोली तालुका यावल येथे नवी दिशा स्वयंअध्ययन अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन ……………………………………………….एरवी व्हाट्सअप ग्रुप म्हटला म्हणजे वायफळ गप्पा आणि आलेले मेसेज फॉरवर्ड करणे एवढाच उद्देश असल्याचे आपण बघत असतो परंतु काही चांगल्या कल्पनेतून नवीन काही करण्याची ऊर्मी सुद्धा या ग्रुपमधून मिळू शकते हे चिंचोली येथील सुसंस्कृत व्हाट्सअप ग्रुप ने दाखवून दिले .या ग्रुपमधील सदस्य श्री अशोक साठे या सुशिक्षित बेरोजगार मुलास वाटले की गावात एखादी अभ्यासिका असली तर विद्यार्थ्यांना एमपीएससी यूपीएससी च्या अभ्यासाची सोय होईल हा विचार ग्रुपमधील सर्व सदस्यांना पटला आणि त्यांनी प्रत्येक सदस्याने स्व परिस्थितीनुसार वर्गणी जमा करायला सुरुवात केली या वर्गणी मधूनच नवी दिशा स्वयंअध्ययन अभ्यासिका सुरू झाली …………………………………………………………आज दिनांक 14 एप्रिल 2019 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त महापुरुषाला अभिवादन करून वाचन प्रेरणा व शिक्षण प्रेरणा देणारा भारतरत्न बाबासाहेबांच्या विचारांची महती गाऊन नवी दिशा स्वयंअध्ययन अभ्यास केंद्राचे उद्घाटन झाले .या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून युवा संत मुमुक्षु राम-राम स्नेही महाराज जोधपुर यांनी शिक्षणाची महती वर्णन करून अभ्यासिकेचे उद्घाटन केले यावेळेस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून किशोर सूर्यवंशी एक सामाजिक कार्यकर्ते व रोटरी अध्यक्ष जळगाव हे उपस्थित होते सदर अभ्यासिके साठी लागणाऱ्या घराची जागेची व्यवस्था त्यांनी कुठलाही पैसा अडका न घेता स्वखर्चातून आपल्या गावातील असलेली जागा उपलब्ध करून दिली .सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सुनिल रूपचंद धनगर चिंचोली हे गाव त्यांचे आजोळ गाव म्हणून ओळखले जाते .त्यांनी आतापर्यंत 50 च्यावर पुरस्कार मिळवलेले आहे चांगल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून सुद्धा करिअर घडविता येते त्यांनी आपल्या स्वतःच्या उदाहरणातून स्पष्ट करून दिले .स्वयमदीप फाऊंडेशनचे तसेच दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा जळगाव येथील संदीप पाटील यांनीसुद्धा विद्यार्थ्यांनी अधिकाअधिक सदर अभ्यासिकेचा लाभ घ्यावा म्हणून मार्गदर्शन केल सदर अभ्यासिकेत लागणाऱ्या पुस्तकांच्या खरेदीसाठी व कोणती पुस्तके घेतली पाहिजे याचे अनमोल मार्गदर्शन त्यांनी केले …………………………………………………………या कार्यक्रमात अभ्यासिका सदस्यांपैकी प्राध्यापक मिलिंद बडगुजर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांची स्वरचित कविता ” मन लाईसन शिक ” ही सादर करून वाचनाचे तसेच अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले व उपस्थित सर्व अध्यक्ष प्रमुख वक्ते प्रमुख पाहुणे यांच्या आभाराचा कार्यक्रम सुद्धा सादर केला सदर कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती तलाठी ग्रामसेवक सरपंच व परिसरातील वाचनप्रेमी अभ्यासप्रेमी मंडळी उपस्थित होती……………….।……………………………………… या अभ्यासिकेच्या माध्यमातून व्हाट्सअप ग्रुप मधून सुद्धा आपण काहीतरी नवीन करू शकतो ही संकल्पना सर्वानपुढे प्रत्यक्ष उदाहरणातून दाखवून देण्याचे कार्य सुसंस्कृत व्हाट्सअप ग्रुप ने केले. सदर व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून स्थापन झालेल्या अभ्यास केंद्रात कुणीही प्रमुख नसून अध्यक्ष नसून, सचिव नसून, व्हाट्सअप ग्रुप मधील सर्व सदस्य हे अभ्यासिकेचे काम बघत असतात त्यासाठी मोलाचे सहकार्य अशोक साठे यांनी केली असून या सदस्यांमध्ये सर्व जाती धर्माचे तसेच परिसरातील जवळपास साडेतीनशे सदस्य आहेत. सदर अभ्यासकांसाठी गावातील शिक्षणप्रेमी मंडळींनी पंखा घड्याळ तसेच पुस्तके तर काहींनी रोख रक्कम देऊन मदत केली त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला या अशा उपक्रमातून लोकांनी प्रेरणा घ्यावी व प्रत्येक गावागावात अभ्यासिका स्थापन करण्याचा प्रयत्न करावा हीच अपेक्षा ठेवतो………………………………………………… आपलाच प्राध्यापक मिलिंद बडगुजर

1 Comment

  1. सुसंस्कृत व्हाॕटस् ॲप गृप चिंचोली च्या अफलातून कार्यक्रमाचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच!
    नवीन कल्पना अंमलात आणतांना त्यांत कोणकोणते मुद्दे समाविष्ठ करावेत याचे उत्कृष्ठ ऊदाहरण म्हणता येईल.
    संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन व सदर गृपचा उफयोग समाजोध्दारांसांठी होणैसांठीच्या कोटीकोटी शुभेच्छाll

Leave a Reply to C.D,Salunkhe Cancel reply

Your email address will not be published.


*