मतदान लोकशाहीचे कर्तव्य प्रत्येकाने बजवावे – नंदुरबार बडगुजर समाज महिला उन्नती मंडळाचे आवाहन

नंदुरबार बडगुजर समाज महिला उन्नती मंडळ हे नेहमी नवीन नवीन अभिनव उपक्रम राबविण्यात अग्रस्थानी असते

मतदान करणे हे भारताच्या नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. कर्तव्य काय ! आपला अधिकार आहे, तो प्रत्येकाने बजवावा असे आवाहन नंदुरबार बडगुजर समाज महिला मंडळ यांनी केले आहे.

येथील लायन्स क्लबच्या अध्यक्ष डॉक्टर सौ. तेजल चौधरी यांनी समाजातील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून मतदान जागृती अभियान राबविण्याबाबत सूचना केली, त्या सूचनेला महिला मंडळाने देखील उस्फुर्त प्रतिसाद दिला . यावेळी महिला मंडळाने पोम्प्लेट वाटप करून मतदान जागृती अभियान राबविले.

तसेच यावेळी महिला मंडळाने सौ नम्रता व श्री गणेश दत्तात्रय बडगुजर यांच्याकडे कन्यारत्न प्राप्त झाल्याने त्यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला

यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनीता बडगुजर, सचिव रेणुका बडगुजर, उपाध्यक्ष पौर्णिमा बडगुजर तसेच इतर सदस्य प्रीती बडगुजर ,वैशाली बडगुजर ,अनिता बडगुजर , स्वाती बडगुजर उपस्थित होते.

1 Comment

  1. लोकशाहीतले श्रेष्ठ दानl
    आपले गुप्त मतदानll
    महान भारताचा महामानl
    प्रत्येकाने करावे मतदानll
    जितके महत्वाचे राष्ट्गानl
    तितकेच महत्वाचे मतदानll
    लोकशाहीसांठी आनबानशानl
    खुल्यादिलाने करा मतदानll

Leave a Reply

Your email address will not be published.


*