महाराष्ट्रातील लोकप्रिय दैनिक लोकमत यांनी 2018 मध्ये गुढीपाडव्यानिमित्त भव्य अशी खानदेश स्तरीय ओपन स्पर्धा आयोजित केली होती , त्यात नंदुरबार येथील चिरंजीव प्रसन्न विजय बडगुजर याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.
चिरंजीव प्रसन्न हा नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल येथील फार्मासिस्ट श्री विजय गोविंद बडगुजर यांचे चिरंजीव आहे . विजय गोविंद बडगुजर हे मूळ पारोळा येथील आहेत नोकरीनिमित्त ते नंदुरबार येथे स्थायिक झाले आहेत चिरंजीव प्रसन्न हा येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथील विद्यार्थी आहे.
लोकमत आयोजित स्पर्धेत प्रथम पारितोषिक एसी ,द्वितीय पारितोषिक एलईडी टीव्ही, तृतीय पारितोषिक वाशिंग मशीन होते, त्याचे वितरण आज दिनांक 9/4 / 2019 रोजी करण्यात आले.
प्रसन्न व त्याचे वडील यांनी नंदुरबार येथील लोकमत कार्यालयात जाऊन आपले पारितोषिक स्वीकारले. याबद्दल नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळ कडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.



चि.प्रसन्न चे प्रसन्न कौतुक व अभिनंदनll
चि.प्रसन्न याचे प्रसन्न मनाने कौतुक व अभिनंदन,भविष्यात विविध स्पर्धेत उज्ज्वल यशासांठी शुभेच्छाll
May god bless you.