व्यक्तिमत्व विकास सीरीज भाग 1 - प्रा. मिलिंद बडगुजर सर

          मोठ्या - मोठ्या लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टी आपण कसे बोलतो चालतो वागतो यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडत असतो. 
               अमेरिकेतील शिकागो परिषद संपल्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या महानगरांमध्ये प्रचार सभा व रॅली आयोजित केलेल्या होत्या तेव्हा एक तरुण विवेकानंदांच्या समोर आला आणि म्हणाला स्वामी मला माझे व्यक्तिमत्व घडवायचे आहे मी काय केले पाहिजे असे विचारले तेव्हा स्वामींनी त्या तरुणाचा हात धरून त्याच्या हातात असलेल्या घड्याळ कडे बघत म्हटले वॉच युवर वॉच स्वामी विवेकानंदांच्या या छोट्याश्या बोलण्यातून त्या तरुणाला खूप मोठा संदेश मिळाला. 
             वॉच या शब्दातील पहिले अक्षर म्हणजे डब्ल्यू (W) म्हणजेच वॉचवर्ड थोडक्यात आपण कोणते शब्द कसे शब्द वापरतो यावरून आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख होत असते आजच्या नवतरुणांच्या भाषेकडे बघितले असता त्यांच्या बोलण्यामध्ये नेहमी च्यायला - मायला, आरे- कारे अशी शब्द सर्रास वापरताना आढळतात शब्दांमध्ये फार ताकत असते खरंतर शब्दांनी आपण एखाद्याचे मन जिंकू शकतो किंवा दुखू शकतो म्हणून शब्द जपून वापरले पाहिजे खरं तर विचार करून बोलावे बोलून विचार करू नये हा मंत्र सतत लक्षात ठेवला पाहिजे योग्य ठिकाणी योग्य शब्दांमुळे आपला प्रभाव पडत असतो चुकीच्या शब्दांच्या वापरामुळे आपले महत्त्व कमी होत असते म्हणून नेहमी आपण आपल्या शब्दांकडे वॉच केले पाहिजे लक्ष ठेवले पाहिजे शब्दांच्या वापरावरून आपण ज्या परिसरात राहतो त्याची ओळख सहज करता येते शब्दांमध्ये असलेल्या शक्तीमुळेच वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला म्हणूनच शब्द तोलून-मापून वापरावेत. 
           शब्दांमधील दुसरे अक्षर आहे ए (A) फॉर ॲक्शन वॉच युवर ॲक्शन आपण जी कृती करत असतो चारचौघांमध्ये वावरत असताना आपण ज्या पद्धतीने वागतो त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होत असते प्रौढांमध्ये आपण जर बालिशपणे वागत असून तर समाज आपल्याला नक्कीच नाव ठेवेल म्हणून आपल्या कृतीकडे लक्ष दिले पाहिजे परदेशातल्या एका मैत्रिणीला भारतातील एका मित्राने आपल्या घरी आयोजित केलेल्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी बोलवले या कार्यक्रमासाठी मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली होती, मंडप टाकण्यात आलेले होते, स्वामींचे निरूपण सुरू असताना हळूहळू गर्दी वाढत गेली तस-तशी मंडळी मंडपाच्या बाजूने असलेल्या खुर्च्यांवर येऊन पोहोचली त्यातही परदेशी मैत्रीण सुद्धा होती हळू हळू ऊनही तापायला लागले तस-   तशी उन्हात असलेली मंडळी सावलीत बसायला लागली मात्र ही परदेशातील मैत्रीण तिथेच बसलेली होती उन्हात बसलेल्या सर्वांनी आपल्या खुर्च्या सावलीत सरकवून  कार्यक्रमाचा आस्वाद घेतला मात्र ही एकटी त्या उन्हात बसून न हलता तो कार्यक्रम ऐकत होती बघत होती. कार्यक्रम संपल्यानंतर मित्रांनी तिला विचारले तुला उन्हाचा त्रास झाला नाही का तेव्हा त्या परदेशातील मैत्रिणीने सांगितले की हो मलाही त्रास होत होता परंतु मी जेव्हा शीत कटिबंधातून समशीतोष्ण कटिबंधात माझ्या मित्राकडे येत आहे तेव्हा मला याची जाणीव होती की मला उन्हाचे चटके सोसावे लागणार आहे म्हणून मी माझी मनाची तयारी केली होती की मला उन्हाचा त्रास सोसावा लागेल मी संपूर्ण वेळ उन्हात बसून स्वामींची निरूपण ऐकत होती उलट आपल्याच देशातील नागरिक उन्हाच्या त्रासाने सावलीत जाऊन बसलेली होती या छोट्याश्या कृतीतून त्या महिलेच्या आणि इतर मंडळींच्या व्यक्ती महत्त्वाची ओळख आपणास होते वडीलधा-या व्यक्तीं समोर आपण कसे बसावे कसे वागावे ही सुद्धा फार महत्वाचे आहे, आजकालची तरूण मंडळी वडीलधाऱ्या लोकांसमोर खुर्चीवर बसून असतात आणि हा वयोवृद्ध उभा असताना दिसतो कितीही गर्दी असली नसली तरी हे तरुण खुर्ची सोडत नाही त्यांच्या या अशा वागण्यातून त्यांच्या कृतीतून व्यक्तिमत्त्वाची ओळख होत असते म्हणून आपल्या कृतींकडे आपण लक्ष दिले पाहिजे. 
              आता वॉच या शब्दातील तिसरे अक्षर म्हणजे T (टी) म्हणजेच टेस्ट थोडक्यात आपल्या आवडी आपल्या आवडीनिवडी आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होत असते एखादी गोष्ट कधी कधी आपल्याला आवडत नसली तरी ती आवडून घ्यावे लागते मात्र बरेच जण न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या कृतीतून व्यक्त करत असतात एका मुलाचे  काका नियोजन मंडळाचे अध्यक्ष होते मुलगा सुद्धा चांगला उच्च सुशिक्षित पीएचडी याच प्रकारे अनेक बक्षीस मेडल मिळवलेला असा होता मात्र नोकरी नसल्यामुळे त्याने आपल्या काकांना सांगितले की काका तुमच्या ऑफिसमध्ये जर तुम्ही माझी शिफारस केली तर मला नोकरी मिळेल म्हणून दिल्लीत असलेल्या काकांनी आपल्या पुतण्याला आपल्या घरी बोलावून घेतले पहिल्या दिवशी मुलगा तसाच बसून राहिला दुसऱ्या दिवशीही काका काहीच बोलले नाही तिसऱ्या दिवशी त्याने काकांना आपली मेडल बक्षिसे दाखवली आणि सांगितले की काका कृपा करून माझी शिफारस करून द्या त्याही दिवशी काका काहीच न बोलता ऑफिसला निघून गेले चौथ्या दिवशी पुन्हा या मुलाने काकांना विनवणी केली कि काका आज बरेच दिवस झाले आपण माझी शिफारस करत नाही म्हणून मी माझ्या घरी परत जातो तेव्हा त्या *काकांनी त्या मुलाला सांगितले गेले चार दिवसांपासून मी बघत आहे की  आपण सोबत जेवण घेत असताना मी तुझ्या प्रत्येक कृतीकडे बारीक लक्ष ठेवून होतो रोज जेवण घेताना थोडे तरी अन्न त्या ताटामध्ये शिल्लक राहू द्यायचा आणि त्यातच हात धूत असायचा आपल्या पोटाला किती लागते याचे गणित तुला जमत नाही का? या देशातील बरेच लोक अर्धपोटी झोपत असतात आणि आपण मात्र अन्न वाया घालवत असतो ज्याला आपल्या जेवनाचे नियोजन करता येत नाही त्याला जीवनाचे नियोजन काय करता येईल आणि या देशाचे नियोजनाचे काय म्हणून मला असं वाटतं की तू आपल्या गावी परत निघून जावे* त्या मुलाला आपली चूक कळून चुकली या काकांनी नंतर त्या मुलाला नियोजन मंडळात कामास लावले आणि पुढे जाऊन तो उत्कृष्ट पप्रकारचा अर्थतज्ञ आणि नियोजन मंडळाचा अध्यक्ष देखील झाला. मित्रांनो लक्षात घ्या की आपल्या छोट्याश्या गोष्टीवरून आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होत असते म्हणून प्रत्येक गोष्ट करत असताना आपल्याला कुणीतरी बघत आहे आपली ओळख त्यातून होत आहे याची जाणीव नेहमी मनात असू द्यावी. 
                वॉच या शब्दातील चौथे अक्षर म्हणजे सी (C) फॉर कॅरेक्टर्स वॉच  युवर कॅरेक्टर्स थोडक्यात विवेकानंदांना सांगायची होती की आपले चरित्र व चारित्र्य जपा त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होत असते मोठ्या व्यक्तींच्या चरित्रा कडे बघितल्यानंतर आपल्याला या गोष्टीची निश्चितच जाणीव होते स्वामी विवेकानंदांचा बांधा तारुण्याचे तेज पाहून एक तरुणी विवेकानंदांवर भुलली विवेकानंदांना म्हणायला लागली मला तुमच्या सारखाच मुलगा पाहिजे विवेकानंदांनी त्या तरुणीला सांगितले की माझ्या सारखेच कशाला मी तुमचा मुलगा होतो मला आज पासून तुम्ही मुलगा माना विवेकानंदांचे या कृतीतून त्या तरुणीला आपल्या चुकीची जाणीव झाली मित्रांनो लक्षात ठेवा कपड्यांवरून आपलं चारित्र्य ठरत नसते आपल्या चालण्या-बोलण्यात वागण्यातून आपल्या चारित्र्याची जडणघडण होत असते 
                   वॉच शब्दातील शेवटचे अक्षर एच (H) फॉर हॅबिट्स आपल्या सवयी आपल्या सवयींवरून आपण कसे आहोत हे सहज ओळखता येते उदाहरणार्थ चारचौघात बसलेले असताना आपण जर बोटाची नखे खात असाल तर त्यातून आपल्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे हे सहज लक्षात येते त्यामुळे इतरांसोबत बसलेले असताना त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी होणे महत्त्वाचे असते काहींना आपल्या बोटांशी खेळणं पायाचे हाताची चाळे करायला आवडतं यातून तुमच्या मधील आत्मविश्वासाची कमतरता सहज लक्षात येते दिलेल्या मुद्द्यावर तुमचे लक्ष नसल्याचे समजते म्हणून आपल्या सवयींकडे प्रमुख्याने बदलले पाहिजे वाईट सवयींचा त्याग करून चांगल्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत त्यातूनच आपल्या व्यक्तिमत्वाची प्रगती साधून एक चांगले व्यक्तिमत्व घडण्यास मदत होत असते थोडक्यात आपण आपल्या वॉच कडे बघितले की आपल्याला आपल्या शब्दांची, कृतींची, आवडीची चारित्र्याची आणि सवयींची आठवण झाली पाहिजे हे निश्चितच. 
              *स्वामी विवेकानंद यांच्या या छोट्याश्या संदेश मधून निश्चितच आपला व्यक्तीमत्व विकास होण्यास मदत होईल अशी अपेक्षा ठेवतो*

_आपलाच प्राध्यापक मिलिंद बडगुजर

प्रा. मिलिंद बडगुजर सर

4 Comments

  1. प्रा.मिलींद बडगुजर यांनी अत्यंत सुटसुटीतरित्या स्वामी विवेकानंद यांचे विचार मांडून व्यक्तीमत्व विकास कसा होऊ शकतो हे समाज युवायुवतीसांठी उपयुक्त ठरेल हे दर्शविले.

  2. फारच छान,उपक्रम व विषयाची मांडणी
    सर,खूप शुभेच्छा

Leave a Reply to Bhavesh Cancel reply

Your email address will not be published.


*