अखंड भारत बडगुजर समाज चामुंडा माता पालखी व श्रीराम नवमी उत्सव समिती कडून साजरा करण्याचे आवाहन

वि.वि. आपणास नवोदय बडगुजर समाज विकास संस्थे अंतर्गत अखंड भारत बडगुजर समाज श्रीचामुंडा माता पालखी व श्रीराम नवमी उत्सव समिती तर्फे नम्रतेने विनंती करण्यात येते की आपला क्षत्रिय बडगुजर समाज हा प्रभू श्रीरामचंद्रांचा वंशज असल्याकारणाने आपल्या बडगुजर समाजाने दरवर्शी “चैत्र शुद्ध नवमी” म्हणजेच “श्रीरामनवमी” हा पावन दिवस बडगुजर समाजा दिवस म्हणून साजरा करावा अशी संकल्पना व विनंती नवोदय बडगुजर समाज विकास संस्था संलग्नित नवोदय युवा – युवती मंचच्या वतीने सन 2018 च्या श्रीरामनवमी पासून करण्यात आली आहे.
प्रिय समाज बंधु – भगिनी, आपण स्थानिक (ग्रामीण /शहर) पातळीवर आपल्या बडगुजर समाजाचे नेतृत्व करीत आहात, सदर विषयाला अनुसरून संपूर्ण बडगुजर समाजाने एकत्रित येवून श्रीरामनवमी हा पावन दिवस बडगुजर समाजाचा दिवस म्हणून इतर कुठल्याही समुदायाच्या भावना न दुखावता, शांततेत, आनंदात व सर्व बडगुजर समाजाने संघटीत होऊन उत्साहात साजरा करावा.
या पावन दिनी दरवर्षी आपला बडगुजर समाज एकत्र आल्यास समाजास एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल.
स्थानिक पातळीवर बडगुजर समाजाचे एक वेगळे प्रभावी अस्तित्व निर्माण होईल. अशा तऱ्हेने समाज संघटीत व मजबुत झाल्यास या माध्यामातून समाजहिताचे व राष्ट्रहिताचे कार्य करणे शक्य व सोपे होईल, एवढाच उद्देश नवोदय बडगुजर समाज विकास संस्थेचा आहे.
सदर कार्यक्रमात आपण आपली कुलदैवत श्रीचामुंडामातेची व प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा पूजन करून भजन, किर्तन किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तथा शक्य झाल्यास वाजत -गाजत मिरवणूक काढण्याचा प्रयत्न करावा.
जर आपल्या परिसरात / गावांत / शहरात श्रीराम मंदिराच्या वतीनेच जर रामनवमीचा कार्यक्रम / पालखीचे आयोजन केले असेल तर त्यात आपल्या समाजाने एकत्रित सहभाग घेऊन सदर सण साजरा करण्याचा प्रयत्न करावा. ज्याप्रकारे इतर प्रत्येक धर्म, समाज हा वर्षातून एक / दोन वेळेस आपापल्या
जाती – धर्मातील “दैवत – संत – महापुरुष” यांची जयंती / पुण्यतिथी /स्मृतीदिन साजरा करतो तसा आपला बडगुजर समाज कधी करतांना दिसत नाही.
हिंदू धर्मातील सर्व सार्वजनिक सण आपण साजरा करीत असतो, यापलीकडे आपल्या बडगुजर समाजाचे वैयक्तिक न कोणाची जयंती ? न कुठला सण -उत्सव ?.
जर आपला क्षत्रिय बडगुजर समाज हा प्रभू श्रीरामचंद्र यांचा वंशज आहे तर मग का म्हणून आपण श्रीराम नवमी हक्काने साजरी करू नये ? याच उद्देशाने या वर्षी दि. 13 एप्रिल 2019 (शनिवार) रोजी बडगुजर समाजाने श्रीरामनवमी या दिवशी बडगुजर समाजाचा दिवस म्हणुन साजरा करून आपल्या क्षत्रिय बडगुजर समाजाने श्रीरामनवमी हा पावन दिन दरवर्षी साजरा करण्याचा प्रयत्न करावा हि नम्रता विनंती

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*