“स्त्री एक रुपे अनेक” “नाव एक कामे अनेक” – प्रा. सी. डी. साळुंके सर

“स्री”:आई-बहिण-सून-आत्या-मावशी-काकू अश्या अनेक वेगवेगळ्या रुपात वावरतांना वेगवेगळे कार्य कुटूंबासांठी न थकतां अविरत करत असतेll.

“चार दिवस सासूचे चार दिवस सूनेचे”हे पिढीजात चालत आलेले आहे आणि चालत राहणार!”

“सास भी कभी बहू थी”l

“बहू भी कभी सास होगी”ll

सून येती घरा सासूचे वाढे कामl

सून सांगे सासू आई करा आरामll

“सून-सासू”बद्दलचे गोड”l
“सासू-सुनेबद्दल वाचा थोडll
“एकमेकीली एकमेकिची जोडl”
“प्रत्येकाला असावी ओढ”l
“म्हणती नसावी मनी खोड”l

फुकाचा मान मनापासून सोडll”

एकदा सून आणि मुलगा बेडरूम मध्ये बोलत असतांना……
आईच लक्ष जातं,
मुलगा – “आपल्या job मुळे
आईकडे लक्ष देतां नाही येणार गं,तिचं आजारपण आणि देखभाल कोण करेल?
त्यामुळे आपण आईला वृद्धाश्रमात ठेवलं तर
तिच्याकडे लक्ष सुद्धां देतील ते “त्या वर त्याच्या बायकोचे उत्तर ऎकून…………..
आईच्या डोळ्यात पाणी आले”.
.
.
.
सून: पैसे कमवण्यासाठी पूर्ण जन्म बाकी आहे हो,पण
आईंची माया किती कमवली तरी कमी आहे,
त्यांना पैश्यापेक्षां आपल्या सहवासाची गरज आहे.
मी ‘job, नाही केला तरी जास्त
नुकसान होणार नाही.
मी आईंजवळ थांबेन,घरी tution घेईन ,त्यामुळे मला आईं जवळही राहता येईल.
विचार करा लहानपणी बाबा
नसूनही घरकाम करून
तुम्हाला आईने वाढवलयं!
त्यांनी तेव्हां कधी शेजारच्या
बाईकडे सुद्धा तुम्हाला ठेवलं नाही,याचे कारण तुमच्याकडे शेजारचे व्यवस्थित लक्ष देऊ शकणार नाहीत हे त्यांना त्यावेळी वाटत असेल हो ना?
आणि तुम्ही मात्र आज आतां हे असं हे चुकीचे बोलत आहांत!
तुम्ही काहिंही म्हणा पण आई -आपल्या जवळच राहतील अगदी शेवटपर्यंत हें तुम्हाला सांगून ठेवते बर्र!
सुनेने दिलेल्या उत्तरामुळे ‘आई’ ला खूप रडू आले, आणि बाहेरच्या खोलीत
येउन देवा जवळ उभी राहते . . .
‘आई’ देव्हाऱ्यापुढे
उभी राहून त्याचे आभार
मानते,आणि म्हणते “देवा मला मुलगी नव्हती म्हणून
खूप भांडली रे मी तुझ्याशी,
पण ही ‘भाग्यलक्ष्मी’ दिल्याबद्दल तुझे आभार कसे मानू मी…..?”
खरच देवा सार्थक केलस माझ आयुष्य अशी सून देऊन .

खरंच प्रत्येक सुनेने जर सासुशी असंच वागलं तर ‘अनाथाश्रम’ राहणार नाहीत…राहणार नाहीतच.ll

ज्या घरी हसत असे सूनसासूl
त्या घरी वाजे सुखाशांतीची धूनll

“हे घ्या आई तीन हजार , ठेवा तुमच्याकडे.”
नवीन सुनबाई ऑफिसला जाताजाता अगदी सहज
म्हणाली,आणि सासुबाईंचे
डोळे भरून आलेत.
“मला कशाला ग एवढे लागतात ? ”
“अहो ,दिवसभर किती गोष्टींना पैसे लागतात बघतेयं न मी
एक महिन्यापासून.
दारावर भाजी,फळवाले येतात.
कधी कामवाली जास्तीचे पैसे मागते. वाशिवाय तुमची भिशी असते, राहू द्या तुमच्याजवळ!”
“अग,पेन्शन मिळते तुझ्या सासऱ्यांची,ते असतांना
त्यांच्याकडे मागत असे ,
आतां न मागतां महिन्याच्या महिन्याला सरकार देते.”सासु हसून म्हणाली.
“तुम्ही भिशीच्या ग्रुप बरोबर
सिनेमा,भेळ पार्टी,एखादं नाटक असे कार्यक्रम ठरवत जा.जरा मोकळं व्हा आई .
ह्यांनी सांगितलंय मला
तुम्ही किती त्रासातून
कुटुंब वर आणलंय ते!
मोठे दादा तर वेगळे झालेत , ताई सासरी खूष आहेत .
मग तुम्ही पण आता आपलं जग निर्माण करा .
मला माहितेय तुम्ही तुमच्या अनेक इच्छा दाबून टाकल्या आहेत….आतां जगा स्वतःसाठी.”
” इतक्या लहान वयात
हे शहाणपण कुठून आलं ग तुझ्यात ?”
“मी दहा बारा वर्षांची असेन . आजी आत्याकडे निघाली होती.
आईने पटकन सहाशे रुपये काढून हातावर ठेवलेता.
अन् म्हणाली,तिथे नातवंडांना बाहेर घेऊन जा,’आजीकडून’ म्हणून काही खाऊ पिऊ घाला खेळणी घेऊन द्या.
आजी आईच्या गळ्यात पडून गदगदून रडली होती .
‘एव्हढे पैसे कधी मोकळेपणाने खर्चच केले नाहीत ग ‘
असे म्हणाली होती.तेव्हांपासून
आजी आणि आई जिवलग मैत्रिणीच झाल्यात……
आई!मला माहितेय,घरचे खटले सांभाळायला तुम्हाला तुमची नोकरी सोडावी लागली होती नं ?
किती वाईट वाटलं असेल?
किती मन मारावं लागलं असेल….?
शिवाय प्रत्येक लहान मोठ्या घरच्याच खर्चासाठी नवऱ्यापुढे हात पसरावे लागले असतील. तेव्हां नवरे देखील
उपकार केल्यासारखे बायकोच्या हातात पैसे ठेवत…….!
तुमची पेन्शन राहू द्या आई.
मला कधी कमी पडले तर मी तुमच्याचजवळ मागेन. ”
“अग,सगळं आजच बोलणार आहेस कां ?
जा आता तुला उशीर होईल.”
“मला बोलू द्या आई .
हे मी माझ्या समाधानासाठी करतेय .
आई म्हणते,की अठरा तास
घरात राबणारी बाई कुणाला कधी समजतच नाही.तू मात्र
तुझ्या सासूच्या कष्टाची कायम जाणीव ठेव . प्रेम पेर,प्रेमच उगवेल.”
सासुने भरल्या मनाने
सुनेच्या गालावर थोपटले .
ती दिसेनाशी होई पर्यंत
दारांत उभी असतांना तिच्या मनात आले,सून आल्यावर
मी आणखीनच घरात अडकेल असे वाटले होते.

तू उलट कवाडं उघडून मला बाहेरचे मोकळे आकाश दाखवलेस गं !!!

                 *"आई"*

सांगतो आई ही आई असतेl
कुणाकडुनही तीची अपेक्षा नसतेll
आई ही तिच्या पोरांची मायl
पोरांना म्हणे तुम्हां देऊ कायll
अहिराणीमा म्हनतस तिल्हे माl
और हिंदी मे कहते उसको अम्माll
इन इंग्लीश शी इज काॕल्ड मदरl
फक्त तीच करते पोरांची कदरll
लेकरांसांठीच तिचा पदरl
लेकरासांठी करते सर्वांचा आदरll
‘आ’चा आत्मा व ‘ई’चा ईश्वर=आईl
पृथ्वीतलावरील सर्वात मायाळू बाईll
सांगू काय सांगू किती तीची महतीl

पृथ्वीतलावर सारेच तीला चाहतीll

“माहेर” हा शब्दच पुरेसा आहे, हा शब्द ऐकूनच मन भरून ये..!!!
प्रत्येक स्त्रीला असे एक गाव असावेll
माहेर” असे त्याचे नांव असावेll
वर्षातुन एकदातरी माहेरी जायला मिळावेll
एकदांतरी जाण्यासाठी मन आतुर असावेll
जाड झालेल्या लेकीला ‘वाळलीस’ म्हणणारे बाबा असावेll
नजरेच्या एक्सरे मधून मन जाणणारी आई असावीll ‘बसा तुम्ही आवरते मी’ अस म्हणणारी वहिनी असावीll
पीठ मळणे नि गूळ किसणे नि कसली किचकट कामे नसावीll
भाची भाच्यानवर आत्या ने भरभरून प्रेम करावेll
आणि भाची भाच्यांना फिरवायला मामा किंवा मावशी असावीll
घर असो कौलारु किंवा मुंबईसारखा फ्लँटll
माहेरवाशिणीला वाटतो तिथे इंद्रप्रस्थाचा थाटll
जुने फ़ोटो पाहून गलबलून यावेll
हसता हसता मधूनच डोळे भरुन यावेll
ऊन पावसाचा असा खेळ रंगात यावाll
आणि अचानक परतीचा दिवस जवळ यावाll
सासरच्यांनी तिथे कधीतरीच ड़ोकवावेll
म्हणुन माहेर आणि सासर ह्यात थोडेतरीll
अंतर असावे थोडेतरी अंतर असावे….!!
प्रत्येक स्त्रीला असे एक गाव असावे..!!

ll”प्रत्येक स्त्रीला नांवगांव अन् माहेर असावे”ll

? || “स्त्रीचे मनोगत” ||?

एखाद्या गृहिणीला जर कुणी विचारले की तू दिवसभर काय करतेस? तर कित्येकदा तिला मी गृहिणी आहे आणि घर सांभाळते असं सांगण्यात कमीपणा वाटतो. ती सहजच म्हणते की, मी ? मी तर काहीच करत नाही.

किंवा घरीच असते असं थोडं दुःखी स्वरात, अपराधी भावनेने सांगते. घरी आल्या आल्या चहाचे फर्मान सोडणाऱ्या नवऱ्याला आज दिवसभर काय केले ह्याचे उत्तर देताना तिला कानकोंडे होत असेल तर तिच्यासाठी ही शंभर अधिक कामांची यादी देते आहे. जी कामे बिनबोभाट होतात आणि अशी काही काम घरात करावी लागतात हे ज्यांना कुणाला तुम्हाला सांगायची वेळ येते त्यांना ह्याची प्रिंट काढून दाखवा.

दैनंदिन कामे

001 फोन चार्ज करणे.
002 पांघरुणाच्या घड्या करणे
003 उठल्यावर पाणी- औषध घेणे
004 व्यायाम करणे
005 पाणी भरणे
006 झाडांना पाणी घालणे
007 डस्टिंग , इतर साफसफाई
008 कपड्यांच्या घड्या करणे
009 चहा-नाश्ता बनवणे
010 स्वयंपाक करणे
011 संपलेल्या सामानाची यादीत अपडेट करणे
012 भांडी पुसून लावणे
013 डायनिंग टेबल आवरणे
014 किचन टॉवेल धुवायला टाकणे
015 सफाई बाथरूम
016 सफाई बेसिन, सिंक
017 सफाई टॉयलेट
018 सफाई हॉल, बेडरूम
019 सफाई गॅलरी
020 स्वतःचे आवरणे
021 पेपर वाचन
022 पुस्तक वाचन, छंद जोपासणे
023 जेवणे, जेऊ घालणे
024 उरलं सुरलं अन्न डब्यात , वाटीत काढणे
025 फेसबुक वाचन, लिखाण, फोन
026 चहा पिणे
027 चालायला जाणे
028 बाजारात जाऊन भाजी घेऊन येणे
029 रोजच्या गरजेच्या वस्तू, वाण सामान मागवणे
030 संध्याकाळी रात्रीच्या जेवणाची तयारी
031 रात्रीचे जेवणे, जेवू घालणे
032 इतर आवराआवर
033 पेपर वाचून तो कपाटात ठेवून देणे
034 दुसऱ्या दिवशीची नाश्ता, जेवणाची तयारी
035 पुस्तक वाचन , फेसबुक वाचन
036 मुलांची खेळणी , इतर पसारे आवरणे

आठवड्याची कामे

037 आरसे पुसणे
038 कपडे प्रेसला देणे
039 प्रेसचे कपडे कपाटात नीट ठेवणे
040 टॉवेल धुणे
041 पुस्तकं आवरणे
042 तिखटामिठाचा डबा , तेल तुपाचे डबे घासणे
043 डबे पुसून घेणे
044 खाऊचे डबे आवरणे
045 किचन पुसून घेणे
046 मायक्रोवेव्ह आतून डीप क्लीन करणे
047 बेडरूम आवरणे
048 स्टडी रूम आवरणे
049 बाथरूम डीप क्लिनिंग
050 गार्डनची व्यवस्था
051 घरातील झाडांना पाणी घालणे
052 आठवड्याच्या भाज्या आणणे
053 फ्रीज साफ करणे
054 फ्रीजमध्ये भाज्या भरून ठेवणे
055 कांदे, बटाटे ट्रॉली साफ करणे
056 पाणी , दूध मागवणे
057 जास्तीचे डस्टिंग टीव्ही, बुकशेल्फ , फ्रीझ
058 औषधे संपली असेल तर मागवणे
059 आठवड्याचे मेनू प्लॅनिंग
060 आठड्याचे कामाचे प्लॅनिंग
061 आठवड्याचे भेटी गाठी, शॉपिंग प्लॅनिंग
062 सुट्टीचे प्लॅनिंग करणे
063 पाहुणे येणार असतील तर विशेष मेनू प्लॅनिंग
064 दरवाजे पुसून काढणे
065 मॉलला भेट देणे
066 जवळपास , बागेत, प्रदर्शन बघायला जाणे

महिन्याची काम

067 सगळ्या बेडशीटस बदलणे , धुणे
068 डबे पाहून जे संपले असेल ते आणि गरजेचे सगळ्या
069 वाणसामानाची यादी करणे,
070 सफाईचे सामान मागवणे
071 वाणसामान मागवणे
072 रिकामे डबे भरून घेणे
073 साबण, शॅम्पू, हँड वॉश रिकामे झालेले बदलणे
074 पगार देणे
075 बिल भरणे: प्रेस, पेपर, लाईट, गॅस, लँडलाईन, मोबाईल
076 फिरायचे प्लॅनिंग करणे
077 सणावाराची तयारी करणे
078 सेल असेल तर त्यानुसार यादी करणे
079 घरी पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी भेटवस्तू आणणे
080 मोठ्या वस्तूंच्या खरेदीचा विचार करणे
081 बिघडलेल्या वस्तूंची दुरुस्ती करून घेणे
082 रद्दी बाजूला काढणे
083 औषध मागवणे
084 मैत्रिणीच्या भेटी-गाठी, भिशी
085 वॉर्डरोब आवरणे
086 जुने कपडे काढून टाकणे
087 डब्यातील जुने खाऊ, डेट संपून गेलेले मसाले -स्नॅक्स फेकून देणे
088 फॅन पुसून घेणे
089 किचन ट्रॉली, इतर डीप क्लिनिंग करणे
090 फॉइल, टिश्यू पेपर, डस्टबिन बॅग मागवणे
091 जुन्या चादरी धुवून घेणे
092 घरात, बाथरूम मध्ये एअरफ्रेशनर बदलणे
093 पार्लरला भेट देणे
094 पर्सची साफसफाई
095 बाहेरगावी जाण्यासाठी तिकिटे बुक करणे
096 गावाला जाऊन आले असले तर बॅग आवरून ठेवणे
097 गावाला जायचे असेल तर बॅगा स्वच्छ पुसून मग भरणे
098 प्रवासासाठी आयकार्ड, तिकिटे, पासपोर्ट, कॅश, कार्ड, गॉगल, चष्मा पर्समध्ये ठेवणे
099 वाढदिवस असेल , इतर काही कार्यक्रम असेल तर भेटवस्तू आणून ठेवणे, त्यानुसार फोन करणे
100 स्वतःच्या, घरातल्या व्यक्तींच्या रेग्युलर टेस्ट्स, चेकअप करून घेणे

अति गृहकृत्यदक्ष विभाग

  1. दूध फ्रीजमध्ये ठेवणे
  2. दही लावणे
  3. साय जमवणे
  4. लोणी काढणे
  5. तूप घरी कढवणे
  6. राहिलेल्या बेरीचे नानाविध प्रकार करणे
  7. वाळवणाचे पदार्थ करणे
  8. फळांचे ज्यूस, शेक, इतर सुप्स नियमित घरी करणे
  9. नवीन पदार्थ , केक , बिस्किटे, पाव घरी करणे
  10. घरात कायम चिवडा , लाडू करणे
  11. सिझनल फुलं, झाडे नर्सरीतून मागवणे

अभया जोशी यांनी सुचवलले यादीत समाविष्ट केलेली कामे

112 देवाची पूजा करणे
113 एखादे व्रत, त्याची तयारी, सण वार साजरे करण्याची तयारी,
114 कपड्यांची डागडुजी.. बटण लावणे, उसवलेले शिवणे..
115 मुलांचा अभ्यास घेणे
116 प्रोजेक्ट बनवणे,……

लिहिल्यापासून मी ही अनेकदा ही लिस्ट अपडेट केली आहे. तरीही लिस्ट अपूर्णच आहे. अजून नोकरी करणाऱ्या, लहान मुले असणाऱ्या, अशा विविध वयोगटानुसार वाढणारी कामे यात अंतर्भूत नाहीतच. रोजचे नव-नवीन प्रसंग आपल्याला नवा अनुभव आणि नवीन काम देतात.

लिहीता लिहीता खालील श्लोक मनात आला.

असित गिरी समं स्यात, कज्जलं सिन्धु पात्रे,
सुरतरुवर शाखा, लेखनी पत्र मूर्वी।
लिखति यदि गृहीत्वा, शारदा सर्व कालं,
तदपि तव गुणानामीश! पारं ना याति।

समुद्राची शाई करून जरी लिहायचे ठरवले तर तीही कमी पडावी असं जर गृहकृत्यदक्ष गृहिणी बद्दल म्हटले तर त्यात काही वावगे वाटून घेऊ नये.

■ स्त्री ■ गृहिणी ■स्त्री▪
“गृहकृत्यदक्ष महामालिनी”■

संकलीतः©कुळकर्णी

आई म्हणजे मंदिराचा कळसl
आईच अंगणातील तुळसll
भजनात गुणगुणावी अशी संतवाणीl
वाळवंटात प्यावं अस् थंडपाणीll
म्हणूनच म्हणतात…………

“डोळे मिटेपर्यंत लेकरांवर प्रेम करत राहते ती आईःईश्वराचा अवतार आई”

माझ्या मनात आई
माझ्या स्वप्नात आई
माझ्या शब्दात आई
माझ्या ह्रुदयात आई
मला हवी माझी आई
सर्वांनांचा हवी आई
“पृथ्वीतलावरील वरदान आई”
===========☝=========

संकलन आणि लेखन – प्रा.‌सी. डी. साळुंके सर, धुळे

प्रा. सी. डी. साळुंके सर, धुळे

Leave a Reply to Chandrakant Dobha Salunkhe Cancel reply

Your email address will not be published.


*