नंदुरबार महिला मंडळाचा अभिनव उपक्रम कन्यारत्न (स्त्री जन्माचे) केले स्वागत

आज प्रत्येक समाजात मुलींचा घटता जन्मदर चिंतेचा विषय बनला आहे . आज प्रत्येकाला आई पाहिजे, बहीण पाहिजे, पत्नी पाहिजे, पण पोटी मुलगी नको !

ही समाजाची विचारधारा बदलावी, त्याच अनुषंगाने नंदुरबार महिला मंडळाने शहरातील बडगुजर समाजातील ज्या स्त्रीयांना कन्यारत्न प्राप्त झाले त्यांना शाल व बुके देऊन गौरविण्यात आले .

त्यात प्रामुख्याने श्री. अजय संतोष बडगुजर व सौ. रिता अजय बडगुजर, श्री भिका भगवान बडगुजर व सौ. अश्विनी भिका बडगुजर यांच्या कन्यांचे व तिच्या मातेचा महिला मंडळामार्फत त्यांच्या घरी जाऊन शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला . या अभिनव उपक्रमाचे कौतुक नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळ, नंदुरबार यांनी देखील केले आहे .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला मंडळ अध्यक्षा सौ. सुनीता मनोज बडगुजर, उपाध्यक्षा सौ. पौर्णिमा अनिल बडगुजर , सचिव सौ. रेणुका शरद बडगुजर सह सौ. रेखा सदाशिव बडगुजर , सौ. स्वाती मिलिंद बडगुजर व सौ. संगीता आबा बडगुजर व सर्व पदाधिकारी महिला मंडळ नंदुरबार यांनी परिश्रम घेतले.

संकलन :- प्रणव सर कोठवाल फागणे

1 Comment

Leave a Reply to Chandrakant Dobha Salunkhe Cancel reply

Your email address will not be published.


*