अर्थे येथील कै. जगन्नाथ सखाराम बडगुजर यांचे हृदयविकाराने निधन

अर्थे ता शिरपूर येथिल प्रगतिशील शेतकरी व बडगुजर समाज युवक मंडळाचे अध्यक्ष श्री नितीन जगन्नाथ बडगुजर यांचे वडील कै जगन्नाथ सखाराम बडगुजर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. अर्थे परिसरातील बडगुजर समाजातील ते एक प्रगतिशील शेतकरी होते त्यांचा वेळोवेळी सामाजिक कार्यात ही सहभाग असायचा. काही दिवसांपूर्वी त्यांचे एन्जोओ प्लॅस्टिचे ऑपरेशन नाशिक येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये झाले होते व ते नियमित तपासणी साठी दिनांक 26 रोजी ज्येष्ठ सुपूत्र श्री नितिन बडगुजर यांच्या सोबत नाशिक येथे जात असतांना धुळे येथे त्यांना अचानक त्रास होऊ लागला व काही क्षणात त्यांचे निधन झाले ही वार्ता अर्थे परिसरात कळताच दुःख संवेदना व्यक्त करण्यात आल्या. त्यांचा स्वभाव गावपरिसरात अत्यंत मनमिळाऊ, शांत असा होता तसेच त्यांची नेहमी सहकार्याची भावना असायची. त्यांची अत्ययांत्र दिनांक 27/O3/2019 रोजी राहत्या घरून दुपारी 12.00 वाजता येथून निघाली त्यांचे दशक्रिया विधी दिनांक 04/04/2019 वार बुधवार रोजी करण्याचे योजिले आहे तर उत्तरकार्य 13 व्या दिवशी 07/04/2019 वार रविवारी करण्याचे योजिले आहे. त्यांना 2 मुलं आहेत श्री नितिन जगन्नाथ बडगुजर हे होमगार्ड आहेत तसेच प्रगतिशील शेतकरी ही आहेत तर त्यांचे दुसरे सुपुत्र श्री रवींद्र जगन्नाथ बडगुजर हे बी. एस. एफ मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

कै. जगन्नाथ सखाराम बडगुजर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*