नवी मुंबई-कोकण परिसर बडगुजर समाज महिला मंडळाच्या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिला अवतरल्या!

नवी मुंबई-कोकण परिसर बडगुजर समाज महिला मंडळाच्या कार्यक्रमात
कर्तत्ववान महिला अवतरल्या!
मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रम रंगला
रविवार दिनांक 10 मार्च रोजी पनवेल येथील बडगुजर समाज महिला मंडळाच्या कार्यक्रमात दिवंगत आणि विद्यमान कर्तृत्ववान तसेच कर्तबगार महिला अवतरल्या. त्यांनी आपला अभिनय आणि संवादाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मान्यवरांच्या उपस्थितीने रंगलेल्या या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. निमित्त होते. जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे.
नवी मुंबई-कोकण परिसर बडगुजर समाज महिला मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात गुणवंत भगिनींचा गौरव, मनोरंजनाचे विविध कार्यक्रम, प्रबोधनात्मक व्याख्यानं, कर्तृत्ववान महिलांची वेशभूषा आणि हळदीकूंकू समारंभ असा भरगच्च कार्यक्रम उत्तरोत्तर रंगला.
आमदारांच्या सौभाग्यवती वर्षा प्रशांत ठाकूर, पनवलेच्या महापौर कविता चौतमोल आणि स्थानिक नगरसेविका राजश्री वावेकर यांनी उपस्थित राहून समाजातील महिलांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाला नवी मुंबई-कोकण परिसरातील बडगुजर समाजाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमास उपस्थित महिला


या कार्यक्रमात समाजातील महिलांनी जिजामाता, अहिल्याबाई, राणी पद्मावती, बहिणाबाई चौधरी, कल्पना चावला, निरजा भानोत, किरण बेदी, लता मंगेशकर, सुषमा स्वराज, सायना नेहवाल आदी कर्तृत्ववान महिलांच्या भूमिका साकारल्या होत्या. यात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार्‍या सौ. रत्नाताई गणेश बडगुजर यांना प्रथम, बहिणाबाई चौधरी झालेल्या सौ. मीना भगवान बडगुजर द्वितीय आणि कल्पना चावला यांची वेशभूषा वठविलेल्या सौ. जयश्री संतोष बडगुजर यांनी तृतीय क्रमांक पटकावला विजेत्या महिलांना पुरस्कृत करण्यात आले.
महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आदर्श शिक्षिका राजश्री भिलमाळ, शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीसाठी अश्विनी गुणवंत बडगुजर, मिसेस नवी मुंबईचा किताब धारण करणार्‍या स्नेहा छाब्रिया आणि उद्योजिका जयश्री संजय बडगुजर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच आरोग्यासंदर्भात प्रबोधन करणार्‍या डॉ. कुंजल पाटील आणि डॉ. चारुस्मिता बडगुजर यांनाही सन्मानित करण्यात आले.


नवी मुंबई-कोकण परिसर बडगुजर समाज महिला मंडळाने आयोजित केलेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्षा वैशाली भालचंद्र बडगुजर, उपाध्यक्षा मीना भगवान बडगुजर तसेच मंडळाचे अध्यक्ष भगवान डोंगर बडगुजर, युवा अध्यक्ष अविनाश बडगुजर, अतुल रामसे आदींनी योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी आणि गायत्री बडगुजर या युवतींनी केले. अनेक समाज बांधवांच्या योगदानातून हा कार्यक्रम यशस्वी झाला.

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*