विकासाच्या वाटेवरती महिला – सौ. भावनाताई बडगुजर

स्त्री शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते फुले दांपत्य, महर्षी धोंडो केशव कर्वे, गो. ग. आगरकर यांच्यासारख्या स्त्रीवादी विचारवंतांची परंपरा महाराष्ट्रात आहे. स्त्री-पुरुष समानतेचा विचारांची परंपरा आपल्या बडगुजर समाजात सुरू झालेली आहे. याचाच परिपाक म्हणजे पतीच्या घरातील पत्नीचा हक्क व मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, महिलांना सर्व क्षेत्रात समान दर्जा देणे, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विशेष प्रयत्न आपल्या समाजामार्फत करण्यात येत आहेत. यापुढे देखील महिलांच्या विशेष कल्याणकारी योजनांवर भर देण्यात येणार आहे.

सौ. भावनाताई सुनिल बडगुजर, औरंगाबाद

राज्यघटनेच्या सरनाम्यात दिलेल्या सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या अभिवाचनाच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय स्तरावर बडगुजर समाजाच्या महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.

महिलांना आत्मसन्मान मिळविण्यासाठी आर्थिक स्वावलंबनाच्या वाटेवरून जावे लागते. यासाठी बडगुजर समाजातील महिला भगिनींसाठी “चामुंडा स्वयंरोजगार” योजने अंतर्गत बचत गटांच्या माध्यमातून विविध वस्तूंचे उत्पादन करून त्यांच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येणार आहे.

केवळ प्रतिष्ठा म्हणून ग्रामीण भागात लग्न व इतर समारंभावर खूप मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. समाजातील सर्व स्तरावर प्रबोधन करून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचा मानस आहे.

बडगुजर समाजातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सक्षमीकरणाबरोबर त्यांच्या आरोग्याचा दर्जा सुधारण्याची गरज ओळखून बडगुजर समाज महिला मंडळ असलेल्या प्रत्येक शहरात व गावांत महिलांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. महिलांच्या संख्येत सातत्याने होणारी घसरण या सामाजिक प्रश्नांवर विशेष तोडगा म्हणून ‘स्त्री भृण हत्या’ ‘गर्भलिंग निदान चाचणी’ या विषयावर पुढील महिला मेळाव्यात चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे.

कुटुंब समाज आणि शासनस्तरावर महिलांचा स्वावलंबन, कौटुंबिक सुरक्षितता आणि विकासाच्या संधी या गोष्टींचा स्वीकार केला तरच महिलांच्या अस्तित्वापासून आत्मनिर्भरतेपर्यंतच्या वाटा मोकळ्या होतील आणि समाजाच्या तसेच देशाच्या विकासात महिला अधिक सक्षमतेने आपले योगदान देऊ शकतील. त्यासाठी समाजानेही महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोनात बदल केला पाहिजे. जोपर्यंत समाजाच्या विचारसरणी रचनात्मक बदल घडत नाहीत तोपर्यंत स्त्रियांसाठी, महिलांसाठी असलेल्या विकास योजना समाजामार्फत प्रभावीपणे राबविल्या जाणार नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. बडगुजर समाजातील महिला शिक्षण, नोकरी व कौटुंबिक जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. आम्ही बडगुजर महिला विकासाच्या वाटेवर आहोत…

सौ. भावना सुनिल बडगुजर, महिला अध्यक्षा, बडगुजर समाज मंडळ औरंगाबाद

3 Comments

    • आशा करूया भावना ताईनच्या स्वप्नाला बदगुजर समाज नक्कीच हातभार लावेल.

  1. You had given good inspiration to the new comerce, develop the social view, and responsibilities, but every person had overthrow it without any expection

Leave a Reply to दिलीप रामकृष्ण बडगुजर Nashik Cancel reply

Your email address will not be published.


*