
महाराष्ट्रात बडगुजर समाजाच्या कुलस्वामिनी चे पहिले मंदिर सोनशेलू येथे उभारण्यात आले. या अगोदर कुलस्वामिनीचे दर्शन घेण्याची इच्छा झाल्यास गुजरातमधील जुनागढ़ला जावे लागत असे. आपल्या महाराष्ट्रातील गरीब समाज बांधव हे चामुंडा मातेच्या दर्शनासाठी एवढ्या लांब जाऊ शकत नव्हते. अशावेळी मातेने कौल दिला व शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलु येथील प्रगतशील शेतकरी कै. बाबुराव नामदेव बडगुजर यांच्या स्वप्नात चामुंडादेवीने येऊन मंदिर निर्मितीची कल्पना दिली.

सन 1991 मध्ये कै. बाबुराव नामदेव बडगुजर यांनी मातेचे मंदिर सोनशेलु येथे उभारण्याची कल्पना गावकऱ्यांना सांगितली पण त्यांची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण होती. शेती हा व्यवसाय. देवाच्या नावाने दिलेले दान वाया जात नाही. दान दिल्याने संपत्ती कमी होत नाही. तर ती वाढतेच या उदात्त हेतूने कै. बाबुराव नामदेव बडगुजर यांनी मंदिरासाठी एक एकर शेत जमीन ट्रस्टला देऊन आपले दातृत्व दाखवले आणि मंदिर बांधकामाला सुरुवात केली व मंदिर निर्मितीचे काम सुरू होताच संपूर्ण महाराष्ट्रातील बडगुजर समाजाला आनंद झाला. आता आपल्या कुलस्वामिनीचे दर्शन जवळच होईल या आनंदाने समाजबांधवांनी मंदिर बांधकामास मदत केली.

मातेच्या कृपेने सोनशेलु गावापासून काही अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात एकांत ठिकाणी मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. मंदिरात सुंदर व सुबक कुलस्वामिनीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हजारो समाज बांधव व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आली. कुलस्वामिनीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात कै. बापूराव नामदेव बडगुजर व कै. मधुकर बाबुराव बडगुजर यांनी मोलाची भूमिका बजावली. पुढे श्रद्धेने व नवसाला पावणाऱ्या या मातेच्या मंदिराकडे भाविक भक्तांचा ओघ वाढत आहे. भाविकांच्या सोयीसाठी कै. बाबुराव नामदेव बडगुजर यांनी कठोर परिश्रम घेतले. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व राहण्याची राहण्यासाठी खोल्यांची व्यवस्था समाजातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून करून घेतले तसेच ट्रस्टचे अध्यक्ष कै. मधुकर भाऊराव बडगुजर व कै. जगन्नाथ शंकर बडगुजर यांनी मंदिर विकासासाठी अतोनात प्रयत्न केले.
सध्या मंदिराचे अध्यक्ष श्री. धिरज मधुकर बडगुजर हे आहेत.


सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्या कार्यरत समाज बांधवांना सह्रस अभिवादन करत आहे.
*llॐ ऐं -हिं क्लीं चामुण्डा विच्चेll*
*ॐ* *ऐं* *-हीं* *क्लिं* *चामुंडा* *विच्चे*