पिप्री ता. धरणगांव येथे सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा जल्लोष

सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा जल्लोष दि.७ मार्च.पिंप्री खु।।. ता.धरणगांव येथिल लिटल चॅम्स इंग्लिश मेडीयम स्कुल प्री.प्रायमरीच्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन फैजपुर येथिल लेफ्टनंट प्रा. राजेद्र राजपुत तर प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय सैन्य दलात जम्मु येथे कार्यरत असलेले जितेंद्र चौधरी, जळगाव जिल्हा परिषद सदस्य गोपालजी चौधरी व इतर मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. “संदेशे आते है संदेशे जाते है” “बाॅर्डर” चित्रपटातील गाण्यावर लिटील चँपच्या अभिनयाने मान्यवर व प्रेक्षकांची मने जिंकली.

व्यासपीठावर उपस्थित मान्यवर
विद्यार्थी जल्लोष करतांना

पुलवामा हल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे खास आकर्षण लल्लाटी भंडार, माऊली पालखी सोहळा या दोन गाण्यावरील चिमुकल्यांच्या नृत्यविष्काराचे प्रेक्षकांनी कौतुक केले. कार्यक्रमास श्री.बबन डोभा साळुंखे, चोपडा यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष श्री.सुरेश बडगुजर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. उपाध्यक्षा व प्राचार्या सौ. शुभांगी बडगुजर यांनी शाळेत राबविले जाणारे उपक्रम प्रास्ताविकातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्थेचे सचिव श्री.गणेश साळुंखे यांनी केले.

प्राचार्या सौ. शुभांगी बडगुजर सत्कार करतांना

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*