नमस्कार?
माझ्या चिमण्यांनो घरट्याचे पुनरुज्जीवन करा!
माझ्या चिमण्यांनो, मी कल्याण येथील आपल्या समाजाची सुरुवातीच्या काळातील बोर्डिंग. त्याकाळी माझ्या सानिध्यात समाजातील अनेक तरुण आले. ते माझ्यासोबत राहिलेत. आज ही मंडळी वयाने आणि पैशानेही मोठी झाली आहेत. ती यशस्वी उद्योजक, नोकरी-व्यवसाय करीत आहेत. आज ही मंडळी आपल्या अलिशान घरात सुखवस्तू जीवन जगत आहेत. परंतु माझ्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मी अखेरच्या घटका मोजत आहे. माझे पुनरुज्जीवन तातडीने करण्याचा संकल्प समाजातील अनेक बांधवांनी केला आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसादही मिळत आहे. परंतु तो पुरेसा नाही. त्यामुळे मी स्वत:च पुढकार घेऊन परिसरातील समस्त समाज बांधवांना आर्जव करते की, या चिमण्यांनो या परत फिरा माझी सद्याची जीर्व अवस्था असह्य झाली आहे, त्यातुन तुम्हीच माझी सुटका करु शकता. तुम्ही दिलेला प्रत्येक पैसा हा माझ्या उध्दारासाठी आणि पुनरुज्जीवनासाठीच खर्च होणार आहे. त्यातुन मला पुर्वीचे वैभव प्राप्त होईल, मी पुन्हा येणार्या पिढीसाठी आश्रयस्थान तसेच उत्कर्ष मंडळाचा मानबिंदू म्हणून ओळखली जाईल. त्यासाठी तुम्ही सढळ हस्ते मदत करुन सामाजिक बांधिलकीच्या या यज्ञात आपले योगदान द्या!
Name of Account :-
Badgujar Samaj Utkarsh Mandal.
Name of Bank :-
The Kalyan Janata Sahkari Bank Limited.
Branch:- Ulhasnagar-4
Account No :-
007010100001613.
IFSC Code :- KJSB0000007.
??धन्यवाद??*



श्री.रमाकांतजी बडगुजर नमस्कार ll
बडगुजर समाज वसतीगृह,काटेमानेवली-कल्याण बद्दलची आर्जवपूर्वक आव्हानास समाज बंधू-भगीनींकडून अभूतपूर्व मदत मिळो अशी प्रभूचरणी कळकळीची विनंती.मी उत्कर्ष मंडळाचे वर दिलेल्या अकौंटमध्ये (येथे जाहिर न करता)यथाशक्ति रक्कम जमा करत आहे.
आपल्या आर्जवपूर्वक आव्हानास त्रीवार सॕल्ल्युटll