बडगुजर वसतीगृह, काटेमानिवली, कल्याण – काल आणि आज श्री. रमाकांत बडगुजर यांच्या नजरेतून

श्री. रमाकांत बडगुजर, सचिव ब.स.उ.मं (ठाणे …मुंबई) आपण, काटेमानिवली कल्याण(पुर्व) वसतीगृहाविषयी जे heart touching विचार व्यक्त केलेत ते प्रत्येक समाजबांधवापर्यंत पोहचने आवश्यक वाटते. 1986 ते 2001 या कालावधित या वसतिगृहाने शेकडो बडगुजर समाज बांधवांना (व इतर जातीतील बांधवाना) आश्रय दिला. या आश्रित बांधवांचे, त्यांच्या कुटुंबियांचे आजचे सुख शांतीचे, समृध्दीचे व भरभराटीचे जीवन केवळ या वसतिगृहाचे फलित आहे. जे बांधव आज लखोपती व करोडोपती आहेत ते फक्त या सामाजिक वास्तुच्या आश्रयाने. ही वास्तु त्या काळात विकत घेणे किती दुरास्पाद होते हे मी सचिव या नात्याने स्वतः अनुभवले. नोकरी वा शिक्षणासाठी आलेल्या बांधवाला डोक्यावर छत नसेल तर किती भयंकर त्रासातुन जावे लागते हा विचार डोक्याला सतत चेतना देई की आपली स्वतःची हक्काची वास्तु पाहिजे. आजच्यासारखा उदंड पैसा नव्हता. पण चांगल्या विचाराची माणसे होती. सामाजिक जाण होती. व्यवहारात पारदर्शकता होती. हातात पुरेसा पैसा नसतांना ही वास्तु विकत घेण्यासाठी NRC कंपनीच्या संपकाळात श्री. आत्माराम सदाजी बडगुजर यांनी Fix Deposit तोडुन 6 हजार रु. (अंदाजे) रक्कम परतीच्या बोलीवर दिली. मी स्वतः तसेच सश्री. निंबाजी भिलाडे, वसंत नथुजी बडगुजर यांनी refundable basis वर मदत करुन वास्तु विकत घेतली. ही पुर्ण रक्कम परतफेड करण्यासाठी रेल्वे पास होल्डर्स सश्री. निंबाजी भिलाडे, मोहन बडगुजर, एस. एम. बडगुजर, नंदवाळकर ग्रुप व समविचारी बांधवांनी अथक प्रयत्न करुन 10 रु. पासुन वर्गणी गोळा करून चांगल्या विचाराला साथ दिली. श्री. संतोषजी पवारांनी लेखाजोगा सांभाळुन अनमोल सहकार्य दिले. श्री. मधुकर पां. बडगुजर, सुधाकर नंदवाळकर, लोहारीकर लक्ष्मण बडगुजर, दिवंगत निळकंठ भा. बडगुजर व समस्त समाजबांधवाच्या सहकार्याने लाभलेल्या या वसतीगृहाचा जिर्णोधार अशीच एक उमदी टीम मंडळाला पुनःक्ष्च मिळाल्याने सुरु झाला आहे. नुतन कार्यकारीणीच्या अजेंडावरील हाती घेतलेल्या कामांपैकी एक महत्वाचे काम कल्याण वसतीगृहाचे जिर्नोधार बांधकाम सुरू झाले आहे. विनंती की,

1) ज्या वसतीगृहातील वास्तव्याने तुम्ही नोकरीत किंवा व्यवसायात चांगल्या नावारूपाला आले त्या वास्तुचे रुप बदलण्यासाठी सढळ हाताने मदत करा.

2) समस्त समाज बांधव आपल्या क्रयशक्तीनुसार भरघोस आर्थिक मदत करा.

3) आपण जर चांगल्या आस्थापनेत वा व्यवसाय करत असाल व आपला pubĺic contact असेल तर मदत करा वा मदत मिळवुन द्या.

4) चांगल्या विचाराने प्रेरीत होऊन नुतन कार्यकारीणीस अशीच सामाजिक कामे करण्यासाठी प्रोत्साहित करा.

5) टिटवाळा (मांडा) येथील समाजाच्या मालकीच्या 2500 sq.ft जागेवर ब.स.उ.मं मंगल कार्यालय आपल्या सहकार्याने व्हावे अशी अपेक्षा करतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*