??????????????????????
पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या तेराव्याच्या आत,
त्या दहशतवादी हैवानांची भारताने केली राख।
आता कुठे थंडावा झाला भारतीयांच्या मनात,
जेव्हा त्यांच्या पापांची फळे दिली त्या पापी स्थानात।
आमच्या वायुसेनेच्या वायुपुत्रांनी जणु पेटवली रावणाची लंका,
आज अभिमानाने भारत पिटतोय या वीरांच्या कौतुकाची डंका।
आमच्या वीर हुतात्म्यांचे मरण गेले नाही फुकट,
आम्ही घेतला बदला अगदी व्याजासकट।
१२ मिराजने २१ मिनिटांत दाखवली त्यांची शक्ति,
सोबत होती वायुसेनेची मायभुमीवरची भक्ती।
आज २६ फेब्रुवारी २०१९ ला पाकचा असा घेतला सुड,
की तेथील दहशतवादी ठिकाणांचेच उखडून टाकले बूड।
आता त्यांनी उठता बसता म्हणू नये हाय हाय,
भारतावर वाकडी नजर टाकताना विचार केला होता काय?
पाकिस्तानात १३ दहशतवादी वस्त्यांना पाडले भगदाड,
पुन्हा आमच्या नादी लागतांना ते विचार करतील विचार।
भारतीय इतिहासात आणखी एक दिवस वीररसाने भरलेला,
भ्याड हल्ले करणाऱ्या एका देशाला ठरवला हरलेला।
उगीच कोणाला त्रास देणारी जर कर्मे करत राहणार,
तर देवसुद्धा शिक्षा देताना नशिबाकडे नाही पाहणार।
आयंदा हमारे रास्ते नही जाना इतना रखे वो ध्यान,
वरना बन जाएगा वो कब्रिस्तान जो आज केहलाता है पाकिस्तान।
शांतीसंदेश देणार्या या संतभुमीचा कोणी पाहू नये अंत,
कारण ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ असे म्हणून गेलेत संत।
??????????????????????
लेखन – सौ. वंदना मदनशेठ बडगुजर, पनवेल


Leave a Reply