पेपर लिहितांना घ्यावयाची काळजी :
समासास लागून दीड सेंटिमीटरपर्यंत दोन रेषा समासास समांतर काढाव्या. उजव्या बाजूने सुद्धा एक सेंटिमीटर अंतर सोडून एक रेष ओढावी. प्रश्न क्रमांक अॅक्टिविटी क्रमांक उपक्रमांक व्यवस्थित लिहावे. ऍक्टिव्हिटी साठी दिलेले रकाने चौकटी नेहमी पेनाने काढाव्यात. अक्षर स्वच्छ व सुंदर काढण्याचा प्रयत्न करावा. चुकलेले उत्तर खोडण्यासाठी केवळ एक रेष किंवा काट मारावा. उत्तरमधील वाक्प्रचार म्हणी अधोरेखित करण्यासाठी पेनच वापरावा. प्रश्नातील उपप्रश्न किंवा नवीन प्रश्न वेगळ्या पानावर सुरु करावा उत्तर ठाऊक असलेले सोपे प्रश्न अगोदर सोडवून उरलेला वेळ कठीण प्रश्नांसाठी द्यावा उत्तर आठवत नसल्यास शांत डोक्याने विचार करून दीर्घ श्वास घेऊन स्मरण करण्याचा प्रयत्न करावा प्रश्नांना असलेल्या मार्कांच्या पद्धतीने वेळेचे बंधन असू द्यावे संपूर्ण पेपर दहा ते पंधरा मिनिटे अगोदर संपेल याची काळजी घ्यावी अधिक वेळ शिल्लक असल्यास उपप्रश्न सोडविण्यास हरकत नाही आपली आयडेंटीटी किंवा ओळख उघड होईल अशा प्रकारची सांकेतिक चिन्हे खुणा किंवा मोबाईल नंबर नाव कुठेही उल्लेखित करू नये सही करताना आपल्या क्रमांका समोरच उपस्थिती ची सही करावी.


Leave a Reply