नंदुरबार-शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलू येथील मॉं चामुंडा माता यात्रोत्सवात २४६ जणांची नेत्रतपासणी करण्यात येवून ५१ जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी यात्रोत्सवात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सालाबादाप्रमाणे यंदाही मॉं चामुंडा माता ट्रस्ट व समस्त बडगुजर समाज सोनशेलू (ता.शिंदखेडा) यांच्यावतीने दि.६ फेब्रुवारी २०१९ बुधवार रोजी तालुक्यातील सोनशेलू येथे भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी अशोक लोटन बडगुजर यांच्या हस्ते सपत्नीक महापुजा व होमहवन झाले. यानंतर महाआरती होऊन फागणे येथील सेवानिवृत्त शिक्षक लोटन भिला बडगुजर यांच्याहस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच याचदिवशी मॉं चामुंडा माता ट्रस्ट, सोनशेलू व अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय, नंदुरबार यांच्या सहकार्याने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन अ.भा.बडगुजर समाज युवक समितीचे अध्यक्ष दिलीप राघो बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात २४६ जणांची नेत्रतपासणी करण्यात येवून ५१ जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी शिबिराचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोषीतील नागरीकांनी सकाळपासूनच आपली हजेरी लावली होती. सर्वसामान्य नागरीकांना या शिबिराचा लाभ झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमास राजकीय नेतेमंडळी, चामुंडा देवी ट्रस्ट, अ.भा.बडगुजर समाज महासमिती तसेच अ.भा.बडगुजर समाज युवक समितीचे पदाधिकार्यांनी हजेरी लावली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धीरज बडगुजर, भाईदास बडगुजर, दंगल बडगुजर, राजेंद्र बडगुजर, दिलीप बडगुजर, रमेश बडगुजर, सुनिल बडगुजर, किशोर बडगुजर, दिगंबर बडगुजर, महेंद्र बडगुजर, रविंद्र बडगुजर, सुधीर बडगुजर, संतोष बडगुजर, मणिलाल बडगुजर, अमोल बडगुजर, विजय बडगुजर, देविदास बडगुजर, दिनेश बडगुजर महेश बडगुजर बडगुजर आदींनी परिश्रम घेतले. राजेंद्र पुंडलिक बडगुजर यांनी यात्रेसाठी मंडप व खुर्चींची मोफत सुविधा उपलब्ध करुन दिली होती. तसेच नंदुरबार येथील संदीप लक्ष्मण बडगुजर यांनी या कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी सहकार्य केले.

Leave a Reply