चलो सोनशेलू

॥जय चामुंडा माता ॥

?‍♂ चलो सोनशेलू ! ?‍♂ चलो सोनशेलू !! ?‍♂ चलो सोनशेलू !!!
? भव्य यात्रोत्सव, मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर
सालाबादाप्रमाणे यंदाही नवसाला पावणारी कुलस्वामिनी आई चामुंडा मातेचा यात्रोत्सव कार्यक्रम दि.०६/०२/२०१९, बुधवार, तिथी माघ शु. बिज (धर्मबिज) रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी ९.०० वाजता होमहवन, १०.३० वाजता महाआरती व ११.०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व ?‍?‍?‍?भाविक भक्तांनी?‍?‍?‍? दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मॉं चामुंडा माता ट्रस्ट व समस्त बडगुजर समाज, सोनशेलू यांच्याकडून करण्यात आले आहे.
? स्थळ : मॉं चामुंडा माता मंदिर, सोनशेलू, ता.शिंदखेडा, जि.धुळे
?????????
?? मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर ??
मॉं चामुंडा माता ट्रस्ट, सोनशेलू व अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय, नंदुरबार यांच्या सहयोगाने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराची वैशिष्ट्ये :
१) नेत्र तपासणी पुणे अंधजन मंडळ संचलित, कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय, नंदुरबार यांच्या नेत्र तज्ञांकडून नेत्र तपासणी केली जाईल.
२) शिबिरातील मोतीबिंदूच्या योग्य रुग्णांना निवडून शस्त्रक्रियेसाठी वाहनाद्वारे रुग्णालयापर्यंत नेले जाईल व शस्त्रक्रिया झाल्यावर शिबिराच्या ठिकाणी सोडण्यात येईल.
३) बीपीएलधारक गरीब व गरजू रुग्णांसाठी विनामुल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया.
४) विदेशी लेन्स, फॅको सजरी व टॉपीकल फॅको (विना भुलीची व बिनटाक्याची शस्त्रक्रिया माफक दरात सुविधा उलब्ध)

? टिप : शिबिरास येताना रेशन कार्ड व आधारकार्ड यांची झेरॉक्स प्रत सोबत आणावी.
? शिबीराचा दिनांक व स्थळ
दि.०६/०२/२०१९, वार-बुधवार
मॉ चामुंडा माता मंदिर, सोनशेलू, ता.शिंदखेडा, जि.धुळे

संपर्क
धिरज बडगुजर (८८३०२३९७००), भाईदास बडगुजर (८५५४८७५०२६), दिलीप बडगुजर (९९२२३३५५५५), रविंद्र बडगुजर (९४२३५१७१७३), महेंद्र बडगुजर (७७७००६२२८८), रमेश बडगुजर (८३९०५८२१७५), राजेंद्र बडगुजर (९५११७५६६०३), डिगंबर बडगुजर (७०३०९८७८१८), दिलीप बडगुजर (९३५९५१९५४१), किशोर बडगुजर (९१५८४११९३८)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*