कविता – तू

कविता -आरती :२१
तू
~~~~

कळूनही
ना कळणारी
अडूनही
ना अडणारी
छळूनही
ना छळणार
चिडूनही
आवडणारी

रानात वनांत
मनात घनात
हवं तिथं वसणारी
आणि तरीही
आहे तिथंच
असणारी

शाश्वत-अशाश्वताच्या
सिमेवर रेंगाळणारी

“तू”
थेट
माझ्या कवितेसारखी..!

——(रसिक:दिवाळी अंक:२००३)
…….अशोक नीलकंठ सोनवणे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*