दर्पण दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन २०१८

दर्पण दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन २०१८
बडगुजर समाजदूत साप्ताहिकाच्या ‘दर्पण’ या दिवाळी विशेषांकाचे दिनांक २१नोव्हेंबर २०१८ रोजी बडगुजर समाज बोर्डींग धुळे या ठिकाणी धुळे शहराचे माजी आमदार बाबासो राजवर्धनजी कदमबांडे यांच्या  हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी श्री.उमेशजी करोडपती,श्री.आनंद भाऊ सूर्यवंशी,श्री.नथ्थु नामदेव बडगुजर, श्री.माधवराव बडगुजर,श्री.भिला गिरधर
बडगुजर(गुरुजी),श्री.विकास पुंडलिक बडगुजर,श्री.राजेंद्र बडगुजर व समाजातील सर्व ज्येष्ठ मंडळी व पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत दर्पण या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमात श्री.ईश्वर बडगुजर सर यांनी प्रास्ताविक सादर केले तसेच श्री.संतोष बडगुजर,श्री.पी.डी.बडगुजर सर आप्पासाहेब श्री.उमेशजी करोडपती यांनी आपापली मते मांडलीत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राजेंद्र भालचंद्र बडगुजर सर कुसुंबा यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.अशोक सिताराम बडगुजर यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमात श्री आनंद भाऊ सूर्यवंशी यांचा वाढदिवस समाजबांधवांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*