राज्यस्तरीय अक्षरधारा कवी संमेलनात कवी श्री. स्वप्निल रामलाल बडगुजर यांनी अक्षरधारेतून उमटला कवितेचा झंकार – श्री. कवी निंबा बडगुजर, एरंडोल

जगतगुरू तुकोबाराय साहित्य परिषद, जामनेर आयोजित राज्यस्तरीय अक्षरधारा कवी संमेलन २०२६ चे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी कवी श्री. स्वप्निल रामलाल बडगुजर यांनी आपल्या खास शैलीत “आई अजुनही वाट पाहते” ही कविता सादर करून रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.कवी श्री स्वप्निल रामलाल बडगुजर यांनी अक्षरधारेतून उमटला कवितेचा झंकार……

कविता एका अशा नात्याबद्दल होती,
ज्याची किंमत आपण अनेकदा उशिरा ओळखतो…
ज्यांनी आपल्यासाठी आयुष्यभर वेळ दिला,
त्यांच्यासाठी आपण थोडासा वेळ देतोय का?
हा एक छोटासा प्रश्न कवितेच्या स्वरूपात मांडला.
ही कविता प्रत्येक त्या आई-बाबांसाठी
आणि प्रत्येक लेकरासाठी होती आणि सामाजिक वास्तव यांचा सुरेख मिलाफ होती. शब्द साधे होते; पण त्यामागचा आशय मनाला भिडणारा होता. त्यांच्या प्रभावी काव्यसादरीकरणाने कविसंमेलनात भावनिक आणि टाळ्यांनी चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.

या उल्लेखनीय काव्यप्रवासाची दखल घेत कवि श्री. स्वप्निल रामलाल बडगुजर यांचा संमेलनाचे अध्यक्ष श्री ईश्वर पाटील यांच्या हस्ते सन्मान व पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या साहित्यिक योगदानाला मिळालेली कौतुकाची पावती असून, जामनेरच्या साहित्यविश्वासाठीही तो अभिमानाचा क्षण ठरला.
आई अजूनही वाट पाहते… 🥺

तुझ्या जन्माची चाहूल लागताच, घरभर आनंद झाला होता,
तुझ्या एका हास्यासाठी, आई-बाबांनी संसार विसरला होता.

तुझ्या पावलांना वाट मिळावी, म्हणून तुझ्या बाबांनी कष्ट केले,
तुझ्याच सुखासाठी आईने, कित्येक अश्रू गाळले .

तुझ्या शिक्षणासाठी झटले, तुझ्या स्वप्नांना पंख दिले,
स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवून, तुझेच आयुष्य घडवले.

तू मोठा झालास, यश मिळवलंस, नवा संसार सजवलास,
पण ज्यांनी तुला घडवलं, त्यांचाच रस्ता विसरलास

आई अजूनही दाराशी बसते, डोळ्यांत वाट पाहते,
“आज येईल माझं लेकरू…” म्हणत, दाराकडे पाहत राहते.

बाबा काहीच बोलत नाहीत, दुःख मनात दडवतात,
“मुलाला वेळ नसेल…” म्हणत, स्वतःलाच समजावतात.

त्यांना नको पैसा, नको महाल, नको सोन्याची छाया,
फक्त दोन प्रेमाचे शब्द, आणि मुलाने जवळ बसावं, एवढीच त्यांची माया.

ज्यांनी हात धरून चालवलं, आज त्यांचाच हात थरथरतो,
ज्यांनी आयुष्य दिलं तुझ्यासाठी, आज तुझ्या वेळेसाठी तरसतो.

पैसा पुन्हा मिळवता येतो, संसार पुन्हा सजवता येतो,
पण आई-बाबांचा हरवलेला क्षण, पुन्हा कधीच नाही मिळवता येतो.

म्हणून आजच जवळ जा त्यांच्या, आणि हातात हात दे,
उद्या उशीर होण्याआधी, प्रेमाचे दोन शब्द दे.

ज्यांनी तुला चालायला शिकवलं, त्यांचा हात म्हातारपणी धर,
हीच खरी संस्कृती, हीच खरी माणुसकी—आणि हाच खरा मुलगा असण्याचा स्वर.
-कवी स्वप्निल रामलाल बडगुजर

✍️
कवी श्री. स्वप्निल रामलाल बडगुजर,
आपल्या दमदार काव्य सादरीकरणाबद्दल आणि राज्यस्तरीय व्यासपीठावर मिळालेल्या सन्मानाबद्दल अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*