सौ वंदना मदन बडगुजर मिसेस रायगडच्या मानकरी

सौ. वंदना बडगुजर मिसेस रायगडच्या मानकरी

नवी मुंबई : डीएस इंटरटेनमेंट आणि लोकमत सखी यांच्या वतीने आयोजित यंदाच्या मिसेस रायगड स्पर्धेच्या मानकरी नवीन पनवेल येथील रहिवासी सौ वंदना मदन बडगुजर या ठरल्या आहेत. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या त्यात दिल्ली येथील इव्हेंट मॅनेजमेंट आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून नवी मुंबईतिल खारघरच्या लिटिल मॉल येथे दिमाखदार सोहळा झाला त्यासाठी परीक्षक मंडळी देखील बाहेरील आणि व्यावसायिक होती. हा भव्यदिव्य सोहळा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी झाला.

उच्च माध्यमिक शिक्षिका सौ वंदना बडगुजर यांनी या स्पर्धेतील सर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्याने यंदाचा मिसेस रायगडच्या मुकुट त्यांना गत विजेत्या मिसेस रायगडच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी आनंद साजरा करत सौ वंदना बडगुजर यांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराप्रमाणे आयोजित या कार्यक्रमाला प्रचंड चुरस होती यंदाचे हे नववे वर्ष होते त्यात 50 ते 60 या वयोगटातील स्पर्धा अत्यंत चुरशीची ठरली आणि अखेरच्या क्षणी सौ. वंदना बडगुजर यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यांना मिसेस रायगडचा मुकुट, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि अन्य भेट वस्तू देण्यात आल्या. त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*