धुळे येथे आदिशक्ती श्री चामुंडामाता मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा; 2 ते 5 जुलै दरम्यान भव्य आयोजन
बडगुजर.इन | धुळे, 29 जून 2026
धुळे शहरात प्रथमच कुलस्वामिनी आदिशक्ती श्री चामुंडामाता मंदिराची उभारणी करण्यात आली असून दि. 2 ते 5 जुलै 2026 दरम्यान मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य-दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे.
दानातून साकारले भव्य मंदिर
श्री चामुंडामाता धर्मादाय ट्रस्ट, धुळे यांच्या माध्यमातून हे मंदिर उभारण्यात आले आहे. रा. धुळे येथील श्री. पंढरीनाथ राजाराम बडगुजर यांनी स्वतःच्या मालकीची जागा मंदिरासाठी दान दिली असून त्यांच्या संकल्पनेतून व समाजबांधवांच्या सहकार्यातून हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे.
चार दिवसीय सोहळ्याची रूपरेषा
गुरुवार, दि. 2 जुलै 2026 – श्री कलश शोभायात्रा
निज ज्येष्ठ कृष्ण द्वितीया, सकाळी 8:30 वाजता वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक, स्वस्तिक सिनेमा येथून शोभायात्रेला प्रारंभ होईल. भाविकांसाठी चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था आहे.
शुक्रवार, दि. 3 जुलै 2026 – प्रथम दिवस
निज ज्येष्ठ कृष्ण तृतीया, सकाळी 9:00 पासून प्राथमिक संकल्प, भद्रसुक्त पठण, पंचांग कर्म, वास्तु मंडल पूजन, योगीनी मंडल पूजन, जलाधिवास व सायंपूजन होईल. सायंकाळी पांझरामातेची आरती संपन्न होईल.
शनिवार, दि. 4 जुलै 2026 – द्वितीय दिवस
निज ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी, सकाळी 9:00 पासून भद्रसूक्त पठण, प्रधान संकल्प, नवग्रह रूद्र पूजन, न्यास, मुख्यदेवता हवन, शय्याधिवास, धान्याधिवास व आरती होईल.
रविवार, दि. 5 जुलै 2026 – तृतीय दिवस
निज ज्येष्ठ कृष्ण पंचमी, सकाळी 8:00 पासून स्थापित देवता होम, मूर्ती स्थापना, पूर्णाहुती व प्राणप्रतिष्ठा विधी पार पडेल. दुपारी 12 वाजेपासून महाप्रसाद व भोजनाचा कार्यक्रम होईल.
पौरोहित्य व आशीर्वाद
प्राणप्रतिष्ठा पूजा वेदमूर्ती श्री. पुष्कर महेंद्र दीक्षित गुरुजी व सहकारी ब्रह्मवृंद, धुळे यांच्या पौरोहित्याखाली होत आहे.
या सोहळ्यास प.पू.ह.भ.प.प्रसाद महाराज, सखाराम महाराज संस्थान अमळनेर; प.पू. आनंदजीवन स्वामी, BAPS स्वामीनारायण मंदिर धुळे; प.पू. सद्गुरु डॉ. श्री. मुकुंदराज महाराज, आनंदवन संस्थान सोनगीर; प.पू. श्री. खगेंद्र महाराज, शहादा; प.पू. श्री. भाऊमहाराज रूद्र, नारायण बुवा समाधी धुळे; प.पू. स्वामी महंत राहूल गीरी, चोटीला, राजकोट व श्री एकविरा देवी मंदिराचे मुख्य पुजारी श्री. चंद्रकांत सोमनाथ गुरव यांचा आशीर्वाद लाभणार आहे.
आवाहन
धुळे शहरातील या पहिल्याच चामुंडामाता मंदिराच्या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सर्व बडगुजर समाजबांधवांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री चामुंडामाता धर्मादाय ट्रस्टने केले आहे.
– बडगुजर.इन प्रतिनिधी

Leave a Reply