कुऱ्हा पानाचे, दि. 14 मे 2026: कुऱ्हा पानाचे येथील रहिवासी आणि ग्रामविकास शिक्षण मंडळाचे चेअरमन श्री. एकनाथ राजाराम बडगुजर व मा. जिल्हा परिषद सदस्या सौ. शशिकला एकनाथ बडगुजर यांची नात, रा. धो. मा. विद्यालयाचे संचालक मा. श्री. घनश्याम बडगुजर तथा व्हाइस चेअरमन सौ. भावना घनश्याम बडगुजर यांची सुकन्या डॉ. स्मितल भावना घनश्याम बडगुजर हिने BDS – Bachelor of Dental Surgery ही प्रतिष्ठित पदवी यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.
कु. स्मितल हिच्या या यशामुळे बडगुजर कुटुंबासह संपूर्ण कुऱ्हा पानाचे गावात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे. वडील घनश्याम भाऊ बडगुजर गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या सेवेचा आणि आईच्या संस्कारांचा वारसा स्मितलने पुढे नेला आहे.

कु. स्मितल ने दहावी चे शिक्षण राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय, कुर्हे पानाचे येथून केले तर १२ वी चे शिक्षण इंदीराबाई ललवाणी महाविद्यालय जामनेर येथून केले. तसेच बी.डी.एस. वैद्यकीय शिक्षण हे A.C.P.M Dental Medical College, Dhule येथून पुर्ण केले. अतिशय अभ्यासू व जिज्ञासू विद्यार्थीनी अआहे सोबतच तिला कला क्षेत्राची पण आवड आहे.
“रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी डॉक्टर आता आपल्या मातीत तयार झाली आहे,” अशा शब्दांत कुर्हे येथील समाजबांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
डॉ. स्मितलच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन होत आहे. घनश्याम भाऊंच्या कष्टाचे, त्यागाचे आणि संस्कारांचे हे फळ असल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली.
आई चामुंडा मातेचा आशीर्वाद स्मितलच्या पाठीशी सदैव राहो व तिने यशस्वी डॉक्टर म्हणून नावलौकिक मिळवावा. तिचे बडगुजर.इन किम कडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

Congratulations
Congratulations to Smital and Proud parents. And wishing you all the best and great success ahead