बुरहानपूर, दि. ७ मे : बुरहानपूर, मध्य प्रदेश येथील डॉ. रूचिका राजेश पवार हिने MBBS च्या अंतिम वर्ष परीक्षेत प्रथम श्रेणीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने 1800 पैकी 1199 गुण मिळवले.
डॉ. रूचिका ही शहरातील प्रसिद्ध डॉ. राजेश श्रावण पवार व शिक्षिका सौ. कांता राजेश पवार यांची सुकन्या आहे. ती स्व. श्रावण मुन्नालाल पवार तथा गं. भा. पुष्पाबाई पवार यांची नात आहे. वडील डॉक्टर आणि आई शिक्षिका असल्याने लहानपणापासूनच तिला अभ्यासाची विशेष गोडी होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची तिची इच्छा होती.

डॉ. रूचिकाचे प्राथमिक शिक्षण नेहरू मॉन्टेसरी स्कूल, बुरहानपूर येथे झाले. दहावीत तिने 92% गुण मिळवून यश संपादन केले. त्यानंतर मेट्रो व्हिजन येथून बारावी करताना तिने 91% गुण मिळवले.
वैद्यकीय प्रवेश परीक्षेत यश मिळवल्यानंतर तिने छिंदवाडा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, छिंदवाडा येथे MBBS साठी प्रवेश घेतला. नुकत्याच जाहीर झालेल्या अंतिम वर्षाच्या निकालात तिने प्रथम श्रेणी पटकावली.
डॉ. रूचिकाने तिच्या यशाचे श्रेय आई-वडिलांच्या अनमोल मार्गदर्शनाला आणि आजी-आजोबांच्या प्रेरणेला दिले आहे.
डॉ. रूचिका पवार हिला मिळालेल्या या यशाबद्दल परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘बडगुजर.इन’ टीमकडून तिचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.


Heartly congratulations