शिरपूर येथील चि.दिपेश विलासराव बडगुजर यांना आयर्लंडमध्ये मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स पदवी प्रदान- श्री.योगेश बडगुजर सर, पिंप्री

शिरपूर येथील सौ. अनिता व श्री. विलासराव दंगल बडगुजर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यालय, शिरपूर) यांचे कनिष्ठ चिरंजीव चि. दिपेश विलासराव बडगुजर यांना Master of Computer Science ही पदवी आयर्लंडमधील नामांकित डब्लिन युनिव्हर्सिटी येथे दि.२५ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात प्रदान करण्यात आली. या समारंभात डब्लिन युनिव्हर्सिटीचे व्हॉइस चान्सलर यांच्या हस्ते त्यांना पदवी बहाल करण्यात आली.

चि. दिपेश बडगुजर यांनी BE (I.T.) – पुणे, तसेच C-DAC, बेंगळुरू (शासकीय संस्था) येथून प्रथम श्रेणीत यश संपादन केले. त्यानंतर Cloud Computing या विषयात Master of Computer Science ही उच्च पदवी आयर्लंडमधील डब्लिन युनिव्हर्सिटी येथून यशस्वीरित्या पूर्ण केली. कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या “कमवा व शिका” या तत्त्वज्ञानानुसार, चि. दिपेश यांनी शिक्षण घेत असताना अर्धवेळ नोकरी करून स्वतःच्या मेहनतीवर परदेशात मास्टर डिग्री पूर्ण केली. सातासमुद्रापार परक्या देशात जाऊन त्यांनी उच्च शिक्षणात उज्ज्वल यश मिळवत एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

घरातूनच शिक्षणाची समृद्ध परंपरा लाभली आहे.
काका डॉ. मुकेश दंगल नंदवे (M.Pharm., Ph.D.) – दिल्ली,
काकू डॉ. सौ. दिपाली मुकेश नंदवे (M.D. Ayur., Ph.D.) – दिल्ली,
मामा डॉ. अतुल साहेबराव बडगुजर (B.A.M.S.) – शिरपूर,
मामी डॉ. सौ. वृषाली अतुल बडगुजर (B.H.M.S., M.D. Homeo) – शिरपूर,
मोठे बंधू श्री. सागर विलासराव बडगुजर (M.Tech.) – Google India, Bangalore,
वहिनी सौ. ऋतुजा सागर बडगुजर (BE, C-DAC) – Manhattan, Bangalore,
बंधू श्री. राकेश विलासराव बडगुजर (Master of Computer Science, USA) – CVS Pharma, Colorado, Denver,
वहिनी सौ. योगेश्वरी राकेश बडगुजर (Master of Computer Science, USA) – Spectrum, Colorado, Denver
यांचा शैक्षणिक वारसा चि.दिपेश यांच्या यशामागे प्रेरणास्रोत ठरला आहे.चि. दिपेश यांना त्यांच्या काका-काकू, मामा-मामी, भाऊ-वहिनी यांच्याकडून उच्च शिक्षणाची प्रेरणा लाभली. सर्वांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत त्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमांच्या जोरावर “अशक्य ते शक्य” करून दाखवत आपले स्वप्न साकार केले

जिद्द, चिकाटी व सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर दीपेशने हे यश संपादन केले. तिन्ही बंधू अभ्यासू व जिज्ञासू असून, आई-वडिलांचे प्रेम, पाठिंबा व योग्य मार्गदर्शन यामुळे आज संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित झाले आहे.या यशामागे आई-वडील, गुरुजन, कुटुंबातील सर्व ज्येष्ठ, आप्तेष्ट व नातेवाईक यांचे योगदान असल्याची भावना व्यक्त करत चि. दिपेश यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, शिरपूरवासीय, बडगुजर समाज तसेच अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. विलासराव दंगल बडगुजर -9403651303

2 Comments

Leave a Reply to Dharmendra Popatrao Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*