पिंपळगाव हरेश्वर येथील श्री. बालु शेठ बडगुजर यांची गुरुगोविंद सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड

पिंपळगाव हरेश्वर: पिंपळगाव हरेश्वर येथील गुरुगोविंद सहकारी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. बालु तुळशीरामशेठ बडगुजर यांची आज दि. ४.१०.२०२५ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. श्री. बालु शेठ बडगुजर हे पिंपळगाव हरेश्वर येथील बडगुजर समाजाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या या अभिनंदनीय निवडीमुळे संस्थेच्या आणि परिसराच्या विकासाला एक नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते सत्कार :
बालु शेठ बडगुजर यांच्या निवडीनंतर, पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी आमदार महोदयांनी बालु शेठ बडगुजर यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव :
बालु शेठ बडगुजर यांची चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल संपूर्ण पिंपळगाव परिसर आणि बडगुजर समाजातर्फे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.

याचबरोबर, पुणे येथील बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे व बडगुजर.इन टिमतर्फे श्री. बालु शेठ बडगुजर यांना त्यांच्या नवीन पदासाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*