भुसावळ येथील प्रसिद्ध उद्योजक, अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती चे अध्यक्ष, जागृती मंडळ भुसावळचे आधारस्तंभ श्री. सुरेश शिवराम महाले (बडगुजर) यांना नुकताच महानंद डेअरी संभाजीनगर तर्फे विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री सुरेश शिवराम महाले यांचा भुसावळ येथे श्री. गणेश दूध डेअरी यांचा व्यवसाय आहे. १९८० साली दसऱ्याला या व्यवसायाची सुरुवात केली होती. ते भुसावळ आणि परिसरात देवगिरी महानंद दूध संघाचे प्रोडक्ट्स चे अधिकृत वितरक आहेत.
डेअरी व दुग्धजन्य पदार्थ या क्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून ते अनेक उद्योजकांना प्रेरणा व मार्गदर्शन देत असतात. तसेच बडगुजर समाजाचे एक दानशूर व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे.
सर्व जण त्यांना अण्णा नावाने संबोधतात. अण्णांची उद्योग क्षेत्रात तर भरारी घेतलीच आहे पण सोबतच सामाजिक वारसा व सलोखा ही जोपासत आहेत. ते सध्या अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष आहेत, तसेच बडगुजर समाज विद्याप्रसारक मंडळाचे माजी उपाध्यक्ष व बडगुजर समाज जागृती मंडळ भुसावळचे आधारस्तंभ आहेत. समाजासाठी सदैव तत्पर असतात. त्यांनी नुकतेच भुसावळ येथे बडगुजर समाजासाठी वीस हजार स्क्वेअर फुट जागा मिळवून दिली. तिथे समाजासाठी समाज भवन किंवा इतर समाजाला उपयोगी वास्तू तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
अण्णा हे नेहमी अनेक समाजबांधवांच्या सुख दुःख च्या वेळी ते तत्परतेने आवर्जून सहभागी असतात. साधी राहणीमान आणि समाज संघटन कौशल्य असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. सामाजिक सलोखा समिती प्रमुख म्हणून त्यांना बरेचसे कौटुंबिक कलह सुद्धा मिटवून त्यांना योग्य मार्गदर्शन केले आहे .
आज त्यांना पुरस्कार मिळाला म्हणून त्यांच्याविषयी थोडं लिहावं असं वाटलं.
पण अण्णा आहे अशा व्यक्तिमत्व आहे की त्यांचा दोन चार ओळी मध्ये आपण वर्णन करू शकत नाही…
तरी त्यांना मिळालेल्या या यशस्वी उद्योजक पुरस्कारासाठी बडगुजर.इन तर्फे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यांच्या या यशस्वी योगदानाबद्दल अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. सुरेश महाले – 94227 73849
खूप खूप अभिनंदन 💐
अभिनंदन!