चि. कुणाल बडगुजरची सरळसेवा परीक्षेच्या माध्यमातून वर्ग-२ अधिकारीपदी निवड!

जळगाव: जळगाव येथील रहिवासी सौ. योगिता आणि श्री. गणेश काशीनाथशेठ बडगुजर यांचा सुपुत्र चि. कुणाल बडगुजर याची जलसंधारण विभागामध्ये क्लास-२ अधिकारी (जलसंधारण अधिकारी) म्हणून राज्य शासनात निवड झाली आहे. कुणाल सध्या जलसंपदा विभाग, जळगाव येथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून कार्यरत आहे.

कुणालचे वडील, श्री. गणेश बडगुजर, वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये कार्यरत आहेत, तर आई सौ. योगिता भारतीय रेल्वे विभागात सेवा बजावत आहेत. कुणाल हा सौ. उषा आणि श्री. काशीनाथशेठ बडगुजर यांचा तसेच सौ. आशालता आणि अशोक शिवदास बडगुजर यांचा नातू आहे.

कुणालची वर्ग-२ अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल बडगुजर समाज तसेच मित्रपरिवारातून त्याचे अभिनंदन होत आहे. त्याचे पुढील ध्येय वर्ग-१ अधिकारी बनण्याचे असून, त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

चि. कुणाल गणेश बडगुजर, जळगाव

2 Comments

  1. खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐

  2. मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा!💐

Leave a Reply to Rajendrakumar Kotwal Cancel reply

Your email address will not be published.


*