एमरल्ड ग्रीन” या हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरचा दर्जेदार अनावरण सोहळा संपन्न -श्री. लोकेश कोतवाल, पुणे

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नवा टप्पा गाठणाऱ्या “एमरल्ड ग्रीन” या आगामी हिंदी चित्रपटाचा ट्रेलर २० जुलै २०२५ रोजी पुण्यात फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथील प्रेव्हीव थिएटर मध्ये लाँच करण्यात आला. आर्टिस्टिक फिल्म्स आणि भावेश प्रोडक्शन बॅनरच्या अंतर्गत तयार झालेला हा चित्रपट १० ऑगस्ट २०२५ रोजी Hungama OTT Platform वर रिलीज होत आहे. या प्रसंगी चित्रपटाच्या संपूर्ण टीमची उपस्थिती होती.
यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक भावेश पाटील, निर्माती आरती परदेशी, मुख्य कलाकार लकी बडगुजर, आदित्य दुर्वे आणि पलक गंगेले, लेखक समीर नेर्लेकर, इंटरनॅशनल आर्ट डायरेक्टर ऐश्वर्या गयगावल, साउंड डिझायनर गुंजन पंचोली, विनय देशपांडे, गायक भावित राठोर, VFX आर्टिस्ट दुर्गेश देवरे, कास्टिंग डायरेक्टर संजय बागुल, लाईन प्रोडूसर विजय माळी, एक्झिक्युटिव्ह प्रोडूसर गिरीश सूर्यवंशी, असिस्टंट डायरेक्टर कल्याणी दातीर आणि इतर तांत्रिक टीम उपस्थित होती. या चित्रपटाचे जण संपर्क व मार्केटिंग ची जबाबदारी गणेश गारगोटे हे पाहत आहे.
चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घालणारा असून, त्यावरून चित्रपटाची कथा सस्पेन्स, रहस्यमय, रोमांचक असल्याचे सूचित होते. या ट्रेलरने सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळवला आहे. हा ट्रेलर भावेश प्रोडक्शन या यूट्यूब चॅनेल वर रिलीज केला गेला आहे. तसेच १० ऑगस्ट पासून हंगामा ओटीटी चॅनेल वर दिसणार आहे.
दिग्दर्शकांच्या मते, “हा चित्रपट एक वेगळी आणि विचारप्रवृत्त करणारी कथा घेऊन येत आहे. “एमरल्ड ग्रीन” ही कथा समीर नेर्लेकर (लेखक) यांनी लिहिलेल्या नॉव्हेल मधली कथा आहे व पटकथा, संवाद लेखण ओमकार शिरगावकर यांनी केले आहे. या कथेच्या रहस्याचा कोणी अंदाजच लावु शकणार नाही.
” हा चित्रपट पाहण्यासाठी १० ऑगस्ट २०२५ पासून हंगामा ओटीटी या चॅनलला सबस्क्राईब करावे.

1 Comment

  1. खुप छान 👍👌💐
    चि.विकीचे हार्दिक अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा!💐
    तसेच आई-वडिलांचे खुप खुप अभिनंदन!💐🙏

Leave a Reply to रामकृष्ण बडगुजर, दोंडाईचा (धुळे) Cancel reply

Your email address will not be published.


*