मुंबई: सौ. समीता आणि श्री. किशोर देवीदास बडगुजर (मुख्य अभियंता, मूळगाव बहादरपूर, सध्याचे वास्तव्य मस्कत, ओमान) यांची कन्या कु. आदिती किशोर बडगुजर १४ जुलै २०२५ रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठात एमबीएच्या उच्च शिक्षणासाठी रवाना झाली. विशेष म्हणजे, तिला ऑस्ट्रेलिया सरकारने प्रतिष्ठित शिष्यवृत्तीही प्रदान केली आहे.
मेलबर्न विद्यापीठात एमबीए अभ्यासक्रमासाठी आदितीला प्रवेश मिळाला आहे, जे जागतिक स्तरावर अव्वल १० मध्ये गणले जाते आणि क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये १३ व्या क्रमांकावर आहे. तिच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी, जीमॅट आणि आयईएलटीएसमधील उच्च गुण तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीमुळे तिला ही शिष्यवृत्ती मिळाली आहे.
यापूर्वी, २०२१ साली आदिती किशोर बडगुजरला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) द्वारे ‘व्हर्बल कमेंडेशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आदितीने पुणे विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक. पदवी संपादन केली असून, त्यानंतर तिने हैदराबाद येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम केले आहे.
श्री. किशोर हे सध्या ओमानमध्ये ‘आयसीए’ कंपनीत रिजनल सेक्शन हेड म्हणून कार्यरत आहेत. आदितीचा भाऊ आर्यन सध्या शिक्षण घेत आहे.


आदितीला निरोप देण्यासाठी तिचे संपूर्ण कुटुंब विमानतळावर उपस्थित होते. आजी-आजोबा, आत्या, मामा आणि इतर कुटुंबीयांकडून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले. आदितीचे आजोबा-आजी सौ. सयाबाई आणि श्री. देवीदास बडगुजर (निवृत्त ग्राम विकास अधिकारी, बहाद्दरपूर) तसेच सौ. आशाताई आणि श्री. भास्कर पवार (मालेगाव, मूळगाव म्हसावद) यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
नवी मुंबई, कोकण परिसर बडगुजर समाज मंडळातर्फे तसेच बडगुजर.इन वेबसाईटतर्फे आदितीला तिच्या पुढील करिअरसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Heartiest. Congratulations Aditi , stay Blessed