पिंपळगाव हरेश्र्वर येथे बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. भगवान दत्तात्रेयशेठ बडगुजर व कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार तसेच बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे तर्फे पिंपळगाव हरेश्र्वर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

दि. 12.7.2025 रोजी शनिवारी पिंपळगाव हरेश्र्वर येथे नुकताच बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे चे नवनिर्वाचित अध्यक्ष – पिंपळगांवचे सुपुत्र श्री. भगवान दत्तात्रेयशेठ बडगुजर यांचा व पुणे येथील संस्थेचे कार्यकारिणी सदस्य यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पिंपळगांव वासियांनी बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे व कार्यकारिणीस आमंत्रित केले असता पुणे मंडळातर्फे पिंपळगाव हरेश्र्वर येथील १०वी / १२वी परिक्षेत ८०% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे चे जेष्ठ सल्लागार सदस्य श्री. प्रदीप त्र्यंबक बडगुजर, कार्यकारिणी सदस्य श्री. प्रशांत माधवराव बडगुजर, पुणे येथील समाज श्री. महेंद्र भालचंद्र बडगुजर, प्रशांत कमलाकर बडगुजर, श्री. बापु दत्तात्रेय बडगुजर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

तसेच यावेळी लोहारी चामुंडा माता बडगुजर समाजाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र बडगुजर व पदाधिकारी व पाचोरा येथील बडगुजर समाजाच्या वतीने श्री. बापु श्रावण बडगुजर यांनी या कार्यक्रमास विशेष उपस्थित राहून श्री. भगवान दत्तात्रेयशेठ बडगुजर पुणे यांचा सत्कार केला.

यावेळी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती चे अध्यक्ष श्री. सुरेशशेठ शिवराम महाले, लोहारी चामुंडा माता मंडळाचे अध्यक्ष श्री. नरेंद्रभाऊ बडगुजर, पिंपळगाव हरेश्र्वर मंडळाचे अध्यक्ष बालूशेठ बडगुजर,
श्री. प्रदीपशेठ रघुनाथ बडगुजर, श्री. मनोज गंगाधर बडगुजर, श्री. किरण शेठ, श्री. रविंद्र नारायण बडगुजर, श्री. डिगंबर सुकदेव बडगुजर, श्री. श्याम भाऊ पवार, पिंपळगाव हरेश्र्वर येथील बडगुजर समाज मंडळ संपूर्ण कार्यकारिणी सदस्य व बडगुजर समाज बांधव उपस्थित होते.

हा कार्यक्रम श्री. विठ्ठल लुकडू बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. सदर कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवर श्री. सुरेशशेठ महाले, श्री. नरेंद्र बडगुजर, श्री. प्रदीप त्र्यंबक बडगुजर, पुणे व श्री. भगवान दत्तात्रेयशेठ बडगुजर पुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. प्रदीप दादा बडगुजर व सुत्रसंचलन श्री. मनोज बडगुजर सरांनी केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*