जळगांव पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी मा. श्री. प्रदीप विश्वनाथ बडगुजर ३८ वर्षे सेवा करून सेवानिवृत्त – डॉ. उमेश बडगुजर, डोंबिवली

🌟 सेवापूर्तीचा गौरवशाली क्षण 🌟

जळगाव पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी मा. श्री. प्रदीप विश्वनाथ बडगुजर सर हे आपल्या ३८ वर्ष २ महिन्यांच्या अत्यंत यशस्वी, निष्ठावान व प्रेरणादायी सेवेनंतर सन्मानपूर्वक सेवानिवृत् होत आहेत.

ते मूळचे शेदुर्णी (ता. जामनेर) येथील असून सध्या जळगावमधील हितवर्षीणी सोसायटीत वास्तव्यास आहेत. शिक्षणानंतर त्यांनी एप्रिल १९८७ मध्ये पोलीस खात्यात सेवा सुरू केली. जळगाव शहर, रावेर, उपविभागीय पोलीस कार्यालय, एलसीबी, एमआयडीसी, बीडीडीएस, तसेच दहशतवाद विरोधी शाखा आणि गुप्तवार्ता विभाग अशा विविध महत्त्वाच्या शाखांमध्ये त्यांनी मोठ्या कौशल्याने व धैर्याने काम केले.

संपूर्ण बडगुजर समाजासाठी श्री प्रदीप बडगुजर हे जळगाव पोलिस दलात आपल्या हक्काचा माणूस होते.

सेवा कालावधीत त्यांनी केवळ पोलीस विभागापुरती मर्यादा ठेवली नाही, तर राज्य व केंद्र सरकारच्या गुप्तचर संस्था जसे की SID, IB, ATS आणि अगदी RAW या अतिशय संवेदनशील विभागांमध्येही त्यांनी आपली अमूल्य सेवा बजावली. त्यांच्या नावावर डिटीएस कोर्स, आयडी कोर्स, गुप्तवार्ता प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांतील व्यावसायिक कौशल्याची मोठी शिदोरी आहे.

त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ०१ मे २००८ रोजी महाराष्ट्र दिनी पोलीस महासंचालक पदक, आणि १५ ऑगस्ट २०१६ रोजी राष्ट्रपती पोलीस पदक यासारखे मानाचे सन्मान त्यांना प्राप्त झाले. हे केवळ पुरस्कार नव्हेत, तर त्यांच्या सेवाभावाची, प्रामाणिकतेची आणि कार्यक्षमतेची पावती आहेत.

केवळ एक अधिकारी नसून एक विचारवंत, स्पष्टवक्ते, प्रेमळ आणि सखोल अभ्यासकही आहेत. समाजाशी नाळ जोडलेली ठेवत त्यांनी सामाजिक बांधिलकीचे भान कायम ठेवले. त्यांच्या सल्ल्याने अनेक तरुण सहकारी घडले आणि प्रेरित झाले.

आई चामुंडा मातांचे आशीर्वाद सदैव त्यांच्यावर राहोत, आणि पुढील आयुष्यही उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व समाधानाने भरलेले जावो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा! 🌺

प्रदीप काका, तुमचा सेवापाठ म्हणजे सर्वांसाठी एक आदर्श आहे. सेवानिवृत्ती ही नव्या प्रवासाची सुरुवात असते. तो प्रवासही तितकाच आनंददायी, यशस्वी आणि निरोगी होवो! 🙏

🎉💐💖

2 Comments

  1. सेवा निवृत्ती नंतर चे आपले आयुष्य सुखी समृद्धी व आरोग्य दायी जावो ही प्रभू चरणी प्रार्थना

  2. सेवा निवृत्ती नंतर आपले आयुष्य सुखी समृद्ध व भरभराटीचे जावो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना .

Leave a Reply

Your email address will not be published.


*