दि. १/६/२०२५ रोजी सकाळी दहा वाजता बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे यांची कार्य करण्याची मीटिंग आयोजित करण्यात आली या मीटिंगमध्ये विद्यमान सचिव व अध्यक्ष यांनी राजीनामा दिले. सर्वानुमते चर्चे अंती ते सर्व संमतीने मंजूर करून नविन अध्यक्षांची व सचिवाची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी श्री. भगवान दत्तात्रय बडगुजर यांची बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांचे नांव सूचक – मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिल गणपत शेठ बडगुजर यांनी सुचविले व याला अनुमोदक मंडळाचे सचिव श्री. रतिलाल रघुनाथ शेठ बडगुजर यांनी दिले.

त्याचप्रमाणे मंडळाच्या सचिव पदी सौ. किर्तीताई महेंद्रशेठ बडगुजर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सौ. किर्ती ताईंचे नांव मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष श्री. राजेंद्र वसंत शेठ बडगुजर यांनी सुचविले व त्यास
श्री. प्रशांत बडगुजर यांनी अनुमोदन दिले.

अतिशय खेळीमेळीच्या आणि हर्ष उल्हासाच्या वातावरणात ही निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. भगवान दत्तात्रेयशेठ बडगुजर पुणे व नवनिर्वाचित सचिन सौ. किर्ती ताईं महेंद्र बडगुजर यांचे बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे चे जेष्ठ सल्लागार मंडळ व सर्व कार्यकारिणी सदस्यांनी अभिनंदन केले. बडगुजर.इन किमी कडून ही नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Leave a Reply