चोपडा येथील श्री. अभिषेक रविंद्र अजेस्त्र यांची एमपीएससी परिक्षेत भरारी – उप अधीक्षक भुमि अभिलेख वर्ग २ (Deputy Superintendent of Land Records (Class – II) पदावर निवड

अभिनंदनीय बातमी

चोपडा येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. पंडितराव विठ्ठल बडगुजर यांचे नातू तथा अ. भा. ब. स. महासमितीचे कार्य. सदस्य, ओबीसी समिती उपप्रमुख श्री. रविंद्र पंडितराव बडगुजर व सौ. उषा रविंद्र बडगुजर यांचे सुपुत्र श्री. अभिषेक रविंद्र अजेस्त्र यांची एमपीएससी परिक्षेत बाजी मारत – उप अधीक्षक भुमि अभिलेख वर्ग २ (Deputy Superintendent of Land Records (Class – II) पदावर निवड.

श्री. अभिषेक हे गेल्या सहा वर्षांपासून वन विभाग महाराष्ट्र राज्य, यात वन परिक्षेत्र अधिकारी या पदावर शिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथे कार्यरत असून आपल्या छोट्याशा कार्यकाळात आपल्या उत्कृष्ट प्रशासनाची छाप वन विभागावर ठसव लि!

श्री. अभिषेक रविंद्र अजेस्त्र यांची एमपीएससी परिक्षे घवघवीत यश संपादन करत उप अधीक्षक भुमि अभिलेख वर्ग २ पदी नियुक्त झाल्या बद्दल श्री. सुरेश शिवराम महाले – अध्यक्ष अ. भा. ब. स. महा समिती यांनी श्री. अभिषेक यांचे विशेष कौतुक करत शुभेच्छा दिल्या. ही समाजासाठी अतिशय अभिनंदनीय बातमी आहे आणि अभिषेक यांचा आदर्श इतरही विद्यार्थ्यांना घ्यावा असे नमूद केले.

श्री. अभिषेक रविंद्र अजेस्त्र यांचे अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती व बडगुजर.इन टिम तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

4 Comments

  1. अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐

  2. श्री.अभिषेक रविंद्र अजेस्र यांचे खुप खुप हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published.


*