पहा हासणं हासणं
आरोग्याचे हे लक्षण
वैद्यकिय शास्त्र सुध्दा
आहे आधार प्रमाण
दुःख कष्ट विसरून
राहू मिळून मिसळून
हासू सर्व खळखळून
होऊ आनंदी प्रसन्न
हासण्याचा मोठागुण
रक्त संचार वाढून
नाड्या शुध्द होऊन
व्याधी जातात पळून
वाढे प्रतिकार शक्ती
संसर्गाची नाही भिती
आरोग्य म्हणजे संपत्ती
येईल सर्वांना प्रचिती
मधुमेह हृद्यविकार
मानसिक रोगावर
असो कुठले आजार
हास्य औषध यावर
माणसाला हे हसणं
देवाचेच वरदान
पशु पक्षी जनावर
नाही यांना हास्य ज्ञान
हास्य टॉनिक समान
उर्जा मिळे रात्रंदिन
ताण तणाव जाऊन
एकाग्र ते होई मन
चार मे हा हास्य दिन
नित्यं ठेवू आठवण
सानथोर सर्वजण
हासू मगे प्रतिदिन
कवी :-
श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल
भ्रमण ध्वनी – 96370 79688


Leave a Reply