प्रवास
आजच्या धकाधकीत
प्रवास नकोसा होतो
धक्के बुक्के देता घेता
जिव मात्र त्रासतो
पुढाऱ्यांची खटपट
जशी खुर्चीसाठी दिसते
प्रवाशांची लटपट
तशी जागेसाठी असते
रेल्वे एस.टी. टॅक्सी
सिटर वा असो रिक्षा
भाववाढ सोसून सुध्दा
ऊभे राहण्याचीच शिक्षा
प्रचंड आवाज गोंगाट
गर्दीसह गाडी थांबते
नळकांड्यातील धुरा प्रमाणे
माणसांना सोडते
नित्य दिनी प्रवासात
कुठे किती मरतात नसे कुणाचे कुणास काही
स्वतःची कामे, उरकतात
माणसांनी सजलेल्या या रस्त्यांवर
होते निरपराध जिवांचे मरण
सोयर सुतक नसलेल्या माणसास
नसे तयांचे स्मरण
यावर उपाय एकच
करा नसबंदी स्वीकार
तरच थांबेल हा
लोकसंखेचा भस्मासूर
अशा या त्रस्त प्रवासास
मी घाबरतो व भितो
म्हणून मला पायीच
प्रवास मस्त आवडतो
कवी :-
श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल
भ्रमण ध्वनी – 96370 79688




Leave a Reply