अर्नाळा, मुंबई येथे राहणारे व मुळगाव अमळनेर जिल्हा. जळगांव येथील श्री. सुनिल सुधाकर बडगुजर यांची दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट (एस. टी. ) मधून ३७ वर्षे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती झाली. त्यांचा सन्मान समारोह अर्नाळा डेपोत काल पार पडला.
श्री. सुनिल बडगुजर यांचा जन्म दि . २५ मार्च १९६७ रोजी झाला, त्यांनी धुळे येथील ओ.के. गिंदोडिया हायस्कूल धुळे मधून SSC चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अर्नाळा आगार पालघर विभाग येथे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट (एस. टी. ) मध्ये त्यांनी वाहक (कंडक्टर) या पदावर ३७ वर्ष नोकरी केली, आज ते वाहक (कंडक्टर) या पदावरून निवृत्त झाले.
त्यांनी आपल्या आयुष्यातील ३७ वर्ष सेवा केली दिली. सध्या ते अर्नाळा आगार पालघर विभागत कार्यरत होते.
स्वभावाने शांत व मनमिळावू असलेल्या श्री. सुनील शेठ यांना त्यांची पत्नी सौ . भारती यांनी त्यांच्या प्रगतीमध्ये मोलाची साथ दिली. तसेच मुलगा सनी व शुभम हे अनुक्रमे कॉम्पुटर व मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून नोकरी करीत आहेत. त्यांचे मधले बंधू श्री. प्रशांत बडगुजर राहणार जळगाव हे आर्टिस्ट व लहान बंधू श्री. निर्मल बडगुजर हे किराना दुकान व्यवसाय करत आहेत.
शुभेच्छांसाठी आपण संपर्क करू शकता श्री. सुनील सुधाकर बडगुजर 98501 25751
गरीब कुटुंबातून पुढे आलेले व स्वकर्तृत्वावर आजपर्यंत मजल मारलेले श्री सुनील शेठ यांना पुढील आयुष्य सुख समाधानाचे जावो व त्यांचे हातून समाजकार्य घडो अशी अपेक्षा ठेवून त्यांना सेवानिवृत्ती निमित्त आपणा सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा…




Leave a Reply