गुटखा
शौक आहे हा लटिका
खाऊ नका हो गुटखा
आनंदाची ही घटिका
याला बसेल फटका
गुटख्यांचे हे प्रकार
केला यांनीच कहर
मुखी कोंबलेला बार
करी तोंडाला प्रहार
गुटखा तंबाखू व बार
ओढे ऐटीत सिगार
बसे जबड्याला मार
दिसे चेहरा भेसूर
कर्करोगाची सुरवात
करी आयुष्याचा घात
मृत्यू दिसे तो दारात
सर्व कुटुंब दुःखात
खोटी प्रतिष्ठा बघता
सोडा गुटख्याला आता
उभं आयुष्य पहता
जपा आरोग्याला आता
व्यसनांना द्या सोडून
होईल जिवनाचं सोनं
नराचा हो नारायण
आहे सर्वांना सांगणं
कवी :-
श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल
भ्रमण ध्वनी – 96370 79688


Leave a Reply