आजी आजोबा घरात…… सुख येईल दारात…
आजी आजोबा संगतीन, स्वर्ग सुख रात्रंदिन,
घर शोभे तीर्थ स्थान, वाटे गोकुळ समान.
आजी आजोबा प्रेमळ, स्वभाव शांत व सरळ,
दोघे मनाने निर्मळ, वृत्ती धार्मिक सोज्वळ.
दोघे जण सल्लागार, देती शिक्षण संस्कार,
शिस्त आणि शिष्टाचार, शिकविती वारंवार.
कधी तरी अचानक, झाली जरी काही चूक,
दाखविती खोटा धाक, सुधार ती वागणूक.
भांडण तंटा झाल्यावर, आई बाप देती मार,
तेव्हा मायेचा पदर, मिळे यांचाच आधार.
दुधा पेक्षा साय वर, प्रेम यांचे खरोखर,
तसे नात-नातूं वर, स्नेह लोभ निरंतर.
नातवंडांच्या हक्काचं, हे नातं आहे जिव्हाळ्याच,
आणि माया ममतेच, व्यासपीठ हे ज्ञानाच.
आजी आजोबा घरी असता, मग कसली चिंता,
सून मुलगा ऑफिस जाता, घर सुरक्षित ते पूर्णतः.
जणू कुलूप व कुंपण, आहेत हे दोघेजण,
धन द्रव्य चांदी सोनं, करतात हे राखण.
आजी-आजोबा, नात-नातूं जेथे, सुख शांती वसे तेथे,
आहे पवित्र हे नातं, घर आनंदित होतं !!!.
कवी :-
श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल
भ्रमण ध्वनी – 96370 79688
छान कविता !