चोपडा येथील भारतीय सैन्यदलातील शहीद जवान स्व. अरूण दिलीप बडगुजर अनंतात विलीन

चोपडा वासियांनी अंत्ययात्रा मार्ग साठी गणेश विसर्जन मिरवणुक वेळेत एकमताने बदल करून अंत्ययात्रेत प्रचंड संख्येने सहभाग

चोपडा येथील भारतीय सैन्यदलातील शहीद जवान स्व. अरूण दिलीप बडगुजर हे दि. ९/९/२०२४ रोजी त्रिपुरा बॉर्डर वर गोळी लागून शहीद झालेत. त्यांची अंत्ययात्रेत प्रचंड जनसमुदाय सहभागी झाला.

आपल्या चोपडा शहरातील शहीद जवान श्री. अरूण दिलीप बडगुजर  ( BSF ) यांच  दि.9/ 9/ 2024  रोजी त्रिपुरा बाॅडर वर अतिरेकी हल्ल्यात गोळी लागून मृत्यु झाला. ही समाजासाठी आणि चोपडेकर वासिंयासाठी अत्यंत दुःखाची बातमी होती. ज्या दिवशी शहीद जवान यांची अंत्ययात्रा निघणार होती. त्याच दिवशी गावातील गणपती विसर्जन पण होते. मार्ग एकच त्यामुळे प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पण चोपडा येथील समस्त जनता, गणपती मंडळे, चोपड्यातील महत्वाची राजकीय नेते मंडळी, मा. आमदार सौ. लताताई सोनवणे, माजी आमदार आण्णासाहेब श्री.चंद्रकांत सोनवणे, मा. खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, माजी विधानसभा अध्यक्ष मा. अरूणभाई गुजराथी साहेब, चोपडा नगरसेवक श्री. गजेंद्र जयस्वाल भाऊ  आणि विषेश म्हणजे अखिल भारतीय बडगुजर महासमिती चे अध्यक्ष मा श्री. सुरेशशेठ महाले साहेब, यांनी शहीद जवानाची अंतयात्रा त्याच मार्गावरून जाण्यास प्रशासनाला सांगितले, त्यावरून जळगांव जिल्हाचे जिल्हाधिकारी साहेब, न्यायाधीश श्री. चव्हाण साहेब , बडगुजर समाजाचे अमळनेर विभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील नंदवालकर साहेब, प्रांत साहेब अमळनेर, चोपडयाचे तहसीलदार साहेब, आणी त्याचे अधिन कर्मचारीवर्ग, तसेच पोलीस अधीक्षक साहेब जळगांव, डी.वाय.एस.पी. साहेब चोपडा, पोलीस निरीक्षक साहेब चोपडा आणि त्यांचा कर्मचारीवर्ग, रिटायर्ड मिलिटरी जवान, आणि ज्ञात-अज्ञात देश भक्तांनी शहीद जवान ची अंतयात्रा त्याच मार्गाने जाण्यास सहकार्य केले. समस्त चोपडा वासियांच्या समंजस भुमिकेमुळे हा मार्ग सुकर झाला. संपूर्ण चोपडा वासियांनी एकमताने यासाठी होकार दिला हे विशेष.

शहीद जवान स्व. अरूण दिलीप बडगुजर (बी. एस. एफ) यांच्या कुटुंबातील सदस्यांची ईच्छा वरील मान्यवरांचे प्रयत्नांमुळे शक्य झाली.

पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, नगर पालिका चोपडा, गणपती मंडळांच विषेश सहकार्य, सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी आणी  चोपडेकर जनतेचे चोपडा बडगुजर समाज आणि अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अध्यक्ष श्री. सुरेश महाले साहेब तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि सलाम.

त्यासाठी समस्त बडगुजर समाज चोपडा व  अ .भा. बडगुजर समाज महासमिती चे अध्यक्ष मा .श्री .सुरेशशेठ महाले हांच्या तर्फे वरील मान्यवरांचे लाख लाख धन्यवाद आणि आभार .🚩
  
भारत माता की जय 🚩
  वंदे मातरम 🚩🙏
  शहीद जवान अमर रहे 🙏🙏

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*